पनवेल तालुका सहकारी भातगिरणीत १५०० शेतकरी बांधवानी केली नोंदणी ...
पनवेल तालुका सहकारी भातगिरणीत १५०० शेतकरी बांधवानी केली नोंदणी 


पनवेल दि.१५ (वार्ताहर) : पनवेल रायगड बाजारच्या समोर पनवेल तालुका सहकारी भातगिरणी येथे पनवेल तालुक्यातील शेतकरी बांधव तयार झालेले भात पिक देण्याकरता कार्यालयात येवून ऑनलाइन नोंदणी करत आहेत. आता पर्यंत १५०० शेतकरी आहे. बांधवानी नोंदणी केली असुन भात उत्पादक शेतकऱ्यांची एकूण संख्या १७०० आहे. मागील वर्षीच्या भात खरेदी दरात १०० रूपये वाढ करुन शासन भात खरेदी करणार असल्याने शेतकरी वर्गात समाधानाचे वातावरण आहे.
विकास प्रकल्पांच्या निमीत्ताने शेतजमीन क्षेत्र कमी होत असल्याची ओरड एकीकडे असता पारंपरिक भात उत्पादक शेतकरी आपल्या उपलब्ध भातशेती क्षेत्रातून चांगल्या पैकी भात पिक घेत असल्याचे या निमीत्ताने स्पष्ट झाले आहे. पनवेल तालुक्यांप्रमाणेच रायगड जिल्ह्यातील उर्वरित सर्व तालुक्यांत देखील भात खरेदी नोंदणी करणा शेतकन्यांनी ऑनलाईन नोंदणी सुरु केली असून आतापर्यंत सुमारे सहा हजार शेतकऱ्यांनी जिल्ह्यात नोंदणी केली असल्याची माहिती प्राप्त झाली आहे.
Comments