शिवसेनाप्रमुख हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिदिनाचे औचित्य साधून नवीन पनवेल येथील ओपन जिमचे उदघाटन...
नवीन पनवेल येथील ओपन जिमचे उदघाटन..

पनवेल दि.१७ (संजय कदम): शिवसेनाप्रमुख हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिदिनाचे औचित्य साधून नवीन पनवेल येथील ओपन जिमचे उदघाटन जिल्हाप्रमुख शिरीष घरत यांच्या हस्ते  आज करण्यात आले. 
               शिवसेनाप्रमुख हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिदिनानिमित्त शिवसेना नविन पनवेल शहर शाखेतर्फे आदरांजली वाहण्यात आली व पक्षप्रमुख तथा मा. मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना जिल्हाप्रमुख रायगड शिरीष घरत यांच्या पाठपुराव्यामुळे मिळालेल्या नविन पनवेल शहर सेक्टर ५ येथील ओपन जिमचे उद्घाटन शिवसेना जिल्हाप्रमुख शिरीष घरत यांच्या शुभ हस्ते करण्यात आले. यावेळी तालुका प्रमुख ज्ञानेश्वर बडे, महानगर प्रमुख एकनाथ म्हात्रे, महानगर समन्वयक दिपक घरत, उपतालुका प्रमुख जगदीश शेळके, उपमहानगर प्रमुख किरण तावदारे, शहर प्रमुख नवीन पनवेल यतीन देशमुख, शहर प्रमुख पनवेल प्रवीण जाधव, शहर प्रमुख खांदाकॉलनी सदानंद शिर्के, महिला आघाडीच्या शहर संघटिका अपूर्वा प्रभु, शारदा पाटील आदि पदाधिकारी आणि जेष्ठ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
फोटो : जिल्हाप्रमुख शिरीष घरत यांच्याहस्ते ओपन जिमचे उदघाटन
Comments