खारघरमध्ये बेकायदा मोटार वाहनदुरुस्ती व फळविक्री करणाऱ्यावर कारवाई...
खारघरमध्ये बेकायदा मोटार वाहनदुरुस्ती व फळविक्री करणाऱ्यावर कारवाई

पनवेल दि. १२ ( वार्ताहर ) :  मोटार  वाहनदुरुस्ती करणाऱ्या १२ जणांवर फौजदारी कारवाई केल्यानंतर खारघर पोलिसांनी त्यांचा फळविक्रेत्यांकडे वळविला आहे. खारघर सेक्टर २० व २१ येथील तिघांवर भारतीय दंड संहिता २८३ प्रमाणे गुन्हा नोंदविण्यात आला.
                     निळकंठ स्वीट या दुकानासमोरून ओवे गावाकडे जाणाऱ्या मार्गावरील विक्रेते सुलतान शेख व तौकीर शेख यांच्यावर कारवाई करण्यात आली. तसेच सेक्टर २० येथील ग्रीन हेरीटेज इमारतीसमोरील मार्गावर नारळपाणी विक्रेता सरफराज शेख याच्यावर पोलिसांनी फौजदारी कारवाई केली.खारघरमध्ये रस्त्याकडेला व रस्त्याच्या अगदी मधोमध दोनशेहून अधिक विक्रेते बेकायदा व्यवसाय करतात. पालिकेने कारवाई करुनही फेरीवाले रस्ता सोडत नसल्याने शहरातील रस्ते मोकळे करून वाहतूक कोंडी फोडण्यासाठी बेकायदा व्यवसाय करणाऱ्या विक्रेत्यांवर कारवाईचे सत्र खारघर पोलिसांनी सुरू केले आहे. याबाबत खारघर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीपान शिंदे यांना विचारले असता त्यांनी अनेकदा पोलिसांनी तोंडी सांगूनही रस्ता अडवून व्यवसाय केल्यामुळे वाहतूक कोंडी होत असल्याने ही कारवाई करणे भाग पडल्याचे सांगितले.
Comments
Popular posts
पनवेल जवळील पाच पीर डोंगर येथे ट्रेकींगसाठी जावून भरकटलेल्या ८ पर्यटकांना पनवेल शहर पोलिस व स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने केले रेस्क्यु..
Image
दुबईतुन गुंतवणुकीचे खोटे आमिष देणाऱ्या टोळीतील एका आरोपीस "सायबर सेल" पनवेल यांनी शिताफीने केले जेरबंद ..
Image
पनवेल शहर परिसरातील चर्चमधील चोरीचे गुन्हे उघडकीस ; पनवेल शहर पोलिसांची धडक कारवाई..
Image
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले बाळासाहेब ठाकरे राज्यस्तरीय फिल्म फेस्टिवलच्या पोस्टरचे अनावरण..
Image
शेतकऱ्यांना सरसकट कर्ज माफी मिळण्यासाठी पनवेल शहर जिल्हा कॉंग्रेसतर्फे आंदोलन..
Image