पनवेल मध्ये भरणार योजनांचा महामेळावा...
पनवेल मध्ये भरणार योजनांचा महामेळावा..

पनवेल :- महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण यांच्या मार्गदर्शनाखाली पनवेल विधी सेवा समिती आणि पनवेल बार असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार दिनांक १३ नोव्हेंबर रोजी पनवेलच्या वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहामध्ये विविध शासकीय योजनांचा महामेळावा आयोजित करण्यात आला आहे. या महामेळाव्याचे बाबत माध्यमांना अवगत करण्यासाठी जिल्हा न्यायाधीश- १ व अतिरिक्त सत्र न्यायाधीश, पनवेल जयराज वडणे यांनी पत्रकार परिषदेस संबोधित केले. यावेळी पनवेल बार असोसिएशनचे अध्यक्ष एड. मनोज भुजबळ उपस्थित होते.
         जयराज वडणे यावेळी म्हणाले की,नागरिकांना लाभदायी ठरणाऱ्या १८ योजनांचे स्टॉल्स उभारण्यात आलेले असून,३१ ऑक्टोबर पासून हे अभियान सुरू झाले आहे.१३ नोव्हेंबर रोजी या अभियानाची सांगत आहोत असून यावेळी प्रातिनिधीक स्वरूपामध्ये लाभार्थींना वाटप केले जाणार आहे. सदरच्या कार्यक्रमासाठी मुख्य जिल्हा न्यायाधीश,अलिबाग येथून सावंत मॅडम, जिल्हाधिकारी डॉक्टर महेंद्र कल्याणकर, पनवेल महानगरपालिकेचे आयुक्त, पनवेल बार असोसिएशनचे अध्यक्ष एड. मनोज भुजबळ यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. नागरिकांनी या योजनांच्या महामेळाव्याचा लाभ घ्यावा असे आवाहन यावेळी वडणे यांनी केले. तर यावेळी मनोज भुजबळ यांनी विधी सेवा समिती, पनवेल करत असलेल्या विविध उपक्रमाबाबत माध्यमांना अवगत केले.

चौकट
पनवेल विधी सेवा समितीच्या वतीने सर्वांना न्याय मागण्याचा अधिकार प्राप्त व्हावा या उदात्त हेतूने तळोजा कारागृहात जाऊन तब्बल २८७५ कैद्यांची एका प्रश्नावली द्वारे मुलाखती घेऊन त्यांना कायदेविषयक मार्गदर्शन केले.
ॲड मनोज भुजबळ.

चौकट

पनवेल विधी सेवा समितीने आदिवासी बांधवांच्या २५ प्रमुख व्यक्तींना कायदेविषयक मार्गदर्शन केले, तसेच त्यांच्या न्याय हक्कांचे बाबत त्यांना जागृत केले व त्यांच्या साठी विशेषत्वाने असलेल्या कायद्यांची त्यांना जाणीव करून दिली. मला खात्री आहे की हे 25 आदिवासी बांधव किमान अडीच हजार आदिवासींपर्यंत हे ज्ञान पोहोचवून त्यांच्या अधिकारांची त्यांना जाणीव करून देतील.
- जयराज वडणे
Comments
Popular posts
बोलघेवड्या योजनांचा भांडाफोड प्रत्यके शिवसैनिकांनी घराघरात जाऊन केला पाहिजे- पुणे संपर्क प्रमुख व आ.सचिन अहिर
Image
पर्यावरण पूरक गणेश उत्सव ; हाच खरा गणेश उत्सव - सुप्रसिद्ध डॉ.गिरीश गुणे
Image
पनवेल शहर जिल्हा राष्ट्रवादी युवक काँग्रेस कार्यकारिणी जाहीर ; महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी युवक काँग्रेस अध्यक्ष महेबूब शेख यांची प्रमुख उपस्थिती
Image
रोटरी क्लब ऑफ पनवेल सेंट्रलतर्फे "सेवाश्री" पुरस्काराने प्रितम म्हात्रे सन्मानित..
Image
केदार भगत मित्र परिवार यांच्या "गणपती आरती संग्रह पुस्तकाचे मा.खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्याहस्ते प्रकाशन...
Image