बारबालेला मारहाण ...
बारबालेला  झाली मारहाण ...


पनवेल दि. ०७ ( वार्ताहर ) :  लीव्ह इन रिलेशनशीपमध्ये मित्रासोबत राहणे एका बारबालेला महागात पडले आहे. दोन वर्षांपासून ही बारबाला रिक्षाचालक मित्रासोबत करंजाडे वसाहतीमध्ये राहत होती. सेक्टर ६ येथील गणेश प्लाझा कॉ. प सोसायटीमध्ये या बारबालेवर मित्रानेच मारहाण केली. 
                          मध्यरात्री इमारतीच्या वाहनतळात बारबालेला मारहाण झाल्याने तिने रिक्षाचालक मित्राविरोधात थेट पोलीस ठाणे गाठले. त्यानुसार पनवेल शहर पोलीस ठाण्यात याबाबत तक्रार नोंदविण्यात आली आहे. मुदतशीर बशीर राऊत असे या मारहाण करणाऱ्या मित्राचे नाव असून तो पनवेल शहरातील पटेल मोहल्ला येथे राहतो.पोलिसांनी बारबालेच्या तक्रारीनंतर मुदतशीर याला नोटीस बजावली आहे. सदर बारबाला  मुदतशीरला न सांगता  नेरूळ येथे गेली. तिने संपर्कच केला नाही. अखेर रात्री ती घरी परतल्यानंतर संतापलेल्या मुदतशीरने तिला हाताबुक्याने मारहाण करुन शिविगाळ केली. पोलिसांनी पुन्हा तंटा न करण्याची सूचना मुदतशीरला केली आहे.
Comments