उभ्या वाहनातून डिझेल चोरी करणारे पोलिसांच्या ताब्यात...
उभ्या वाहनातून डिझेल चोरी करणारे पोलिसांच्या ताब्यात...
  
पनवेल दि ०४, (संजय कदम) : पनवेल परिसरात विविध ढाबे, हॉटेल व मोकळ्या जागेत ट्रक किवा अवजड वाहने उभे असल्याचे पाहून त्यातील डिझेल टाकीतून डिझेल चोरी करणाऱ्या दोघा आरोपीना पनवेल शहर पोलिसांनी ताब्यात घेऊन त्यांच्या कडून डिझेल चा चोरीचा साठा हस्तगत केला आहे. 
        तालुक्यातील शिरढोण येथील पेट्रोल पपं परिसरात त्याच प्रमाणे पनवेल उपजिल्हा रुग्णालय समोरील उभ्या केलेल्या आम्ब्युलन्स मधून व पाडेघर परिसरातील एका बस मधून आरोपींनी मोठ्या प्रमाणात डिझेल ची चोरी केल्याची तक्रार पनवेल शहर पोलीस ठाण्यात दाखल होताच वरिष्ठ पोलीस निरिक्षक विजय कादबाने यांच्या मार्गदर्शनाखाली पोउपनि अभयसिंह शिंदे, पोहवा रविंद्र राऊत, पोना परेश म्हात्रे, पोना महेंद्र वायकर, पोना  विनोद देशमुख, पोना रविंद्र पारधी, पोशि विवेक पारासुर, पोशि प्रसाद घरत आदींच्या पथकाने सराईत डिझेल चोर शहाबाज फकरुद्दीन अन्सारी (वय ३०) व शेरसिंग नरपतसिंग राठोड या दोघांना ताब्यात घेतले असून त्यांच्याकडून चोरीचे डिझेल हस्तगत करण्यात आले आहे. तसेच या गुन्ह्यात तीन आरोपी पसार असून त्यांचा शोध पनवेल शहर पोलीस करीत आहे.
Comments