पत्नीच्या प्रेम संबंधांतून पतीने केली आत्महत्या ...
पत्नीच्या  प्रेम संबंधांतून पतीने केली आत्महत्या ...


पनवेल दि. ०७ ( वार्ताहर ) :  कामोठेतील एका नवविवाहितेने प्रेमसंबंधात अडथळा ठरणाऱ्या पतीला प्रियकराच्या मदतीने मानसिक त्रास दिल्याने पतीने आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. या घटनेनंतर कामोठे पोलिसांनी नवविवाहिता व तिच्या प्रियकराविरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करून पुढील तपासाला सुरुवात केली आहे. 
                           या घटनेतील मृत पतीचे नाव पलाश रघुवंश बिरेंद्रप्रताप सिंग (३१) असे असून तो कामोठेत राहत होता. त्याचा विवाह आग्रा येथे राहणाऱ्या आयुशीसोबत झाला होता. तिचे आग्रा येथील अविलकुमार मौर्यासोबत प्रेमसंबंध असताना तिने घरच्यांच्या आग्रहामुळे पलाशसोबत विवाह केला होता. कामोठेत पतीसह राहून ती प्रियकरासोबत फोनवरून चॅटिंग करत होती. ही माहिती पलशला समजल्यानंतर त्याने तिला समजावण्याचा प्रयत्न केला होता.  मात्र तो तिला आवडत नसल्याचे व त्याच्यासोबत राहणार नसल्याचे तीने सांगितले होते. तिच्या प्रियकरानेही आयुशीसोबत त्याचे संबध कायम राहणार असल्याचे सांगितले होते. तसेच पलाशला जिवे ठार मारण्याची धमकी दिली होती. त्यानंतर आयुशीने आपल्या प्रेमसंबंधातील अडथळा दूर करण्यासाठी पलाशच्या डोक्यात बियरची बाटली मारुन त्याला ठार मारण्याचा प्रयत्न केला होता. पत्नी व तिच्या प्रियकराकडून सतत मानसिक छळ होत असल्याने पलाशने घरी गळफास घेऊन आत्महत्या केली होती. या घटनेनंतर पलाशच्या वडिलांनी कामोठे पोलिसांकडे आयुशी व तिचा प्रियकर अवीलकुमार मौर्या या दोघांविरोधात तक्रार दाखल केली होती. त्यानंतर पोलिसांनी या प्रकरणाचा प्राथमिक तपास करून या दोघांविरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला.
Comments
Popular posts
देशाचे पुढचे राजकारण आपल्या मनासारखे होण्यासाठी इंडियाने एकरूप होऊन काम करावे लागेल - शिवसेना नेते मा.खासदार अनंत गीते..
Image
नैना हटाव शेतकरी बचाव अंतर्गत सिडकोविरोधातील शेतकऱ्यांच्या आमरण उपोषणाला शिवसेनेचा(उद्धव बाळासाहेब ठाकरे) सक्रिय पाठिंबा..
Image
बाबासाहेब लिगल पँथर संघटनेच्या नेतृत्वात पनवेलमध्‍ये प्रथमच भव्य संविधान सम्मान शोभायात्रा(मिरवणुक)संपन्न...
Image
१५ वर्षीय मुलाला कायदेशीर रखवालीतून नेेले पळवून...
Image
तुरमाळे येथील नैना विरोधातील आमरण उपोषणास भेट देत शिवसेना नेते मा.खासदार अनंत गीते यांनी दिला पाठींबा...
Image