विवाहिता बेपत्ता ...
पनवेल दि. ०७ ( वार्ताहर ) : पनवेल तालुक्यातील रोडपाली येथे राहणारी एक विवाहिता कोणास काही एक न सांगता कोठेतरी निघून गेल्याने ती हरविल्याची तक्रार कळंबोली पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे .
सौ. अनिता बबलू जैयस्वाल ( वय २६ ) अंगाने सडपातळ ,उंची पाच फूट तीन इंच ,रंग सावळा , केस लांब व काळे , चेहरा गोल ,नाक सरळ असून तिच्या अंगात निळ्या रंगाची साडी व निळ्या रंगाचा ब्लाउज घातलेला आहे . या महिले बाबत कोणाला अधिक माहिती असल्यास कळंबोली पोलीस ठाणे पोलीस नाईक जे. पी. पाटील यांच्याशी संपर्क साधावा .
फोटो - अनिता बबलू जैयस्वाल