उभ्या ट्रेलरला गाडीची धडक ; एक ठार दोन जखमी ...
उभ्या ट्रेलरला गाडीची धडक ; एक ठार दोन जखमी ...

पनवेल दि. ०६ ( वार्ताहर ) : उभ्या ट्रेलरला भरधाव वेगाने आलेल्या गाडीची धडक बसून झालेल्या अपघातात एक ठार तर दोन जखमी झाल्याची घटना पनवेल जवळील टी पॉईंट पळस्पे ते जेएनपीटी महामार्गावर आज पहाटे घडली आहे . 
                 पनवेल जवळील टी पॉईंट पळस्पे ते जेएनपीटी महामार्गावर आज पहाटे रस्त्यावर उभ्या असलेल्या ट्रेलरला हुंडाई गाडीवरील चालकाने धडक दिल्याने झालेल्या अपघातात प्रणव कोळगावकर ( वय २५ ) हा गंभीररित्या  जखमी होऊन मयत झाला आहे . तर गाडीतील प्रशांत खाडे ( वय २५ ) व शंतनू पोतदार ( वय २४ ) हे जखमी झाले आहेत . या अपघाताची नोंद पनवेल शहर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे .
Comments