रेल्वे स्टेशन परिसरात आढळला मृतदेह ...
रेल्वे स्टेशन परिसरात आढळला मृतदेह ...


पनवेल / दि. ०७ ( वार्ताहर ) : पनवेल ते खांदेश्वर रेल्वे स्टेशनजवळ एका व्यक्तीचा मृतदेह आढळला आहे. त्याच्या नातेवाइकांचा शोध पोलीस घेत आहेत. कुजलेल्या अवस्थेत आढळलेल्या व्यक्तीची माहिती स्टेशन मास्तरने दिली. त्यानुसार या व्यक्तीस उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे डॉक्टरांनी व्यक्तीला तपासून मयत घोषित केले.                          मयत व्यक्ती अंदाजे ३५ वर्षांची असून उंची ५.५ फूट, अंगाने मध्यम असून त्याचे केस काळे आहेत. मनगटावर आर व्ही  गोहिल असे इंग्रजीमध्ये लिहिले आहे. अंगात निळा शर्ट, नेव्ही ब्लू पॅन्ट घातलेली आहे. या व्यक्तीविषयी माहिती असल्यास पनवेल रेल्वे पोलीस ठाणे किंवा ०२२-२७४६७१२२ अथवा ९४९४९१२२९४ येथे संपर्क साधावा, असे आवाहन पोलीस उपनिरीक्षक डी. एस. बदाले यांनी केले आहे.
Comments