प्रसिध्दीसाठी पनवेल येथे मराठा क्रांती स्वराज्य संघटना तर्फे रुग्णवाहिका लोकार्पण सोहळा संपन्न होणार - पी.डी.देशमुख ...
लोकार्पण सोहळा संपन्न होणार - पी डी देशमुख..

पनवेल / ( प्रतिनिधी) मराठा क्रांती स्वराज्य संघटना या राष्ट्रीय कृत अधिकृत मान्यता प्राप्त संस्थेकडून कोकण विभागाला रुग्णवाहिका लोकार्पण सोहळा आयोजित करण्यात येणार असून या वेळी दिग्गज मराठ्यांच्या उपस्थितीत प्रमुख राष्ट्रीय पदाधिकारी व राज्य अध्यक्ष यांच्या उपस्थितीत संपन्न होईल असे सूतोवाच रायगड जिल्हा अध्यक्ष उद्योजक पी डी देशमुख यांनी पत्रकारांना सांगितले या वेळी राष्ट्रीय संस्थापक अध्यक्ष सदानंदराव भोसले कोकण प्रदेशाध्यक्ष निवृत सहाय्यक पोलीस आयुक्त श्री विनोदराव चव्हाण आदी मान्यवर उपस्थित होते
       या वेळी बोलताना मराठा समाज नेते उद्योजक पी डी देशमुख यांनी सांगितले लवकरच पनवेल येथील जुने प्रांत अधिकारी कार्यालय समोर मराठा क्रांती स्वराज्य संघटना कोकण प्रदेश मध्यवर्ती कार्यालय उद्घाटन सोहळा दिवाळी नंतर कोकण प्रदेशाध्यक्ष निवृत एसीपी विनोदराव चव्हाण साहेब यांनी आयोजीत केला त्याचे उद्घाटन राष्ट्रीय कार्याध्यक्ष ज्येष्ठ समाज नेते उद्योजक गजाननराव साळुंखे यांच्या हस्ते करण्यात येणार असल्याचे प्रतिपादन केले या वेळी समाजातील विविध क्षेत्रातील मान्यवर पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत तर मुंबई येथील आगामी काळात होणाऱ्या राष्ट्रीय स्नेह संमेलन पनवेल येथील मराठा समाज मेळावा दिनदर्शिका प्रकाशन सोहळा अशा अनेक स्तुत्य उपक्रम रेलचेल ठरवण्यात आली असुन पनवेल येथील मराठा समाज बांधव मोठ्या संख्येने सामील झाले आहेत उद्योजक वैभव देशमुख सुमित झुंजारराव राजेंद्र भगत आदी मान्यवर पदाधिकारी उपस्थित होते
Comments