श्री सामाजिक शैक्षणिक सांस्कृतिक क्रीडा संस्थेतर्फे संस्कृती संवर्धन प्रतिष्ठानचा कार्यक्रम संपन्न..
संस्कृती संवर्धन प्रतिष्ठानचा कार्यक्रम संपन्न


पनवेल दि.०६ (संजय कदम) : श्री सामाजिक शैक्षणिक सांस्कृतिक क्रीडा संस्था, करंजाडे, यांच्यातर्फे मंगेश शेलार यांनी सलग पाचव्यांदा नवरात्री महोत्सव मोठ्या प्रमाणात आयोजित केला होता. दररोज ६०० हून अधिक नागरिकांनी उस्फूर्तपणे लाईव्ह ऑर्केस्ट्राच्या तालावर गरबा-दांडिया नृत्यात सहभाग घेतला होता. या कार्यक्रमात आमदार महेश बालदी, विनोद साबळे, कर्णाशेठ शेलार यांनी आपली उपस्थिती दर्शवली.

नवरात्री महोत्सवाची सांगता विजयादशमी-दसऱ्याच्या दिवशी  एका विशेष कार्यक्रमाने झाली. भारतात दर वीस मिनिटाला एक बलात्कार होतो, अशी सरकारी आकडेवारी सांगते आहे. महिलांच्या स्वसंरक्षणासाठी "संस्कृती संवर्धन प्रतिष्ठान" यांचे शिवकालीन शस्त्रांचे उत्कृष्ट प्रात्यक्षिके सौ. शोनल मेहरोळे यांच्या मार्फत दाखवण्यात आली. यात लाठीकाठी, बनाटी, तलवारबाजी, दांडपट्टा, भाला इत्यादी शस्त्राचा समावेश होता. उपस्थित नागरिकांनी घोषणा देऊन त्यावेळी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला . "संस्कृती संवर्धन प्रतिष्ठान महाराष्ट्र, रायगड जिल्हा संयोजिका सौ. शितलताई निकम यांचे या विषयावरचे उल्लेखनीय भाषण झाले. सौ.मनिषा म्हात्रे-निमसे यांच्या सहयोगाने हा कार्यक्रम घेण्यात आला. या कार्यक्रमाचे आयोजक मंगेश शेलार हे महिलांचे स्वसंरक्षण या विषयात नियमित ट्रेनिंग सुरू करण्याचे नियोजन करत आहेत. तसेच ते सतत विविध सामाजिक कार्यक्रमाचे नियोजन करण्यात पुढाकार घेत असतात.


फोटो : आमदार महेश बालदी यांचा सत्कार व शिवकालीन शस्त्राचे उत्कृष्ठ प्रात्यक्षिके
Comments
Popular posts
'शौर्यम दिवस' के मौके पर 'शौर्यम ट्रिब्यूट बाइक राइड' का आयोजन...
Image
नवीन पनवेल मध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) तर्फे एसटी स्मार्ट कार्ड वाटप...
Image
हृदयाच्या आरोग्यासाठी खारघरमध्ये 'वॉकेथॉन' ; जागतिक हृदय दिनानिमित्त मेडिकव्हर हॉस्पिटल्सचा उपक्रम...
Image
स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाच्या युथ रिपब्लिकनचे रायगड जिल्हाध्यक्ष महेश साळुंखेंची पेणमध्ये सदिच्छा भेट ; बौद्ध महासभेच्या कार्यक्रमाला उपस्थिती
Image
उड्डाणपुलाखालील मोकळ्या जागेत क्रीडांगण उभारण्याची मागणी ; नगरसेवक ऍड.मनोज भुजबळ यांचे महापौरांना निवेदन
Image