मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची उत्कर्ष सांस्कृतिक कला आणि क्रीडा मंडळाच्या नवरात्रोत्सवास भेट..
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची उत्कर्ष सांस्कृतिक कला आणि क्रीडा मंडळाच्या नवरात्रोत्सवास भेट..
पनवेल वैभव /  दि.०१ (संजय कदम) : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज पनवेल येथे आले असता त्यांनी उत्कर्ष सांस्कृतिक कला आणि क्रीडा मंडळास भेट दिली व अंबेमातेचे दर्शन घेतले. यावेळी मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी त्याचे शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. 
महाराष्ट्रात जिओच्या 5 जी सेवा सुरू करण्यासाठी एका कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पनवेल मध्ये आले असता. त्यांनी पोदी येथे असलेल्या सामाजिक कार्यक्रमात द्वारे पंचक्रोशीत प्रसिद्ध असलेल्या उत्कर्ष सांस्कृतिक कला आणि क्रीडा मंडळाच्या वतीने आयोजित नवरात्रो उत्सव कार्यक्रमास भेट दिली.
 यावेळी माता भगिनींनी त्यांचे औक्षण करून स्वागत केले. त्यांनतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अंबेमातेचे विधिवत पूजन करून आशीर्वाद घेतले. यावेळी मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी त्याचे शाल व श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. यावेळी त्यांच्यासमवेत भारतीय जनता पार्टी रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश बालदी, आमदार महेंद्र थोरवे, भाजप प्रदेश ओबीसी मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष व मा.नगरसेवक अॅड मनोज भुजबळ, मा.नगरसेवक प्रकाश बिनेदार, मा.नगरसेवक तेजस कांडपिळे, मा.नगरसेविका सुशीला घरत, मा.नगरसेवक संदीप पाटील, जगदीश घरत, प्रशांत भुजबळ, राकेश भुजबळ, तेजस भुजबळ, अजित लोंढे, पद्मसिंह चव्हाण, सुजित लोंढे, अॅड संकेत भुजबळ, हेमंत भुजबळ, प्रशांत फुलपगार यांच्यासह भुजबळ कुटुंबीय उपस्थित होते.

फोटो : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे उत्कर्ष सांस्कृतिक कला आणि क्रीडा मंडळाच्या वतीने स्वागत करताना पदाधिकारी
Comments