आंगणवाडीची झालेल्या दुरावस्थेबाबत शिवसेनेने उठवला आवाज ; केली तात्काळ दुरुस्तीची मागणी ..
 तात्काळ दुरुस्तीची मागणी ..

पनवेल दि.११ (संजय कदम) : पनवेल तालुक्यातील महोदर येथील आंगणवाडीची दुरावस्था झाली असून या संदर्भात आज शिवसेनेने आवाज उठवून तात्काळ दुरुस्त करुन देण्याची मागणी केली आहे 
याबाबत शिवसेना पनवेल तालुका प्रमुख विश्वास पेटकर यांनी पनवेल पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यांना निवेदन दिले. यावेळी त्यांच्यावतीने सहाय्यक प्रशासन अधिकारी बहिराम यांनी स्वीकारले. या निवेदनात त्यांनी म्हटले आहे कि, तालुक्यातील महोदर गावातील आंगणवाडीची अत्यंत दुरावस्था झाली आहे. तरी शासनाच्या योजनेचा वापर करून सदर आंगणवाडीची तातडीने दुरुस्ती करावी व नुतणीकरण करावे अशी मागणी केली आहे. यावेळी त्यांच्यासोबत महिला तालुका संघटिका सौ दमडे, मोहदरचे शाखा प्रमुख एकनाथ शिनारे, युवासेनेचे कुणाल कुरघोडे, रविंद्र पाटील, सुरज पाटील आदी उपस्थित होते.
फोटो : गटविकास अधिकारी यांना निवेदन देताना शिवसेना पदाधिकारी
Comments