रिक्षाचालकांच्या प्रामाणिकपणामुळे महागडा मोबाईल मिळाला परत ...
रिक्षाचालकांच्या प्रामाणिकपणामुळे महागडा मोबाईल मिळाला परत ..

पनवेल दि.१६ (वार्ताहर) : रिक्षाचालक आणि प्रवासी यांच्यातील वाद सर्वश्रुत आहेत. दररोज अशा आशयाच्या बातम्या आपण वाचत असतो. मात्र, समाजात प्रामाणिकपणे रिक्षा चालवून आपला उदरनिर्वाह उत्तम उदाहरण खारघरमध्ये पाहावयास मिळाले आहे. 
पनवेल ते खारघर दरम्यान प्रवास करणाऱ्या प्रवाशाचा मोबाइल हनुमंत विठ्ठल यमगर यांच्या रिक्षात विसरला गेला होता. मोबाइल मालक प्रवाशाचा शोध घेत यमगर यांनी तो परत केला आहे. विशेष हा मोबाइल परत करताना या रिक्षाचालकाला चांगलीच कसरत करावी लागली. तो बंद असल्याने हनुमंत यमगर याने आपल्या घरी तो आधी चार्ज केला. जेणेकरून ज्याचा मोबाइल आहे त्यांचा या मोबाइलवर फोन येईल व ते संबंधितांना देण्यास सोपे जाईल. मात्र, मोबाइल चोरीला गेल्याचे गृहीत धरून मोबाइल मालकाने कंपनीशी संपर्क साधून सीमकार्ड ब्लॉक केले. सीम कार्यान्वित नसल्याने मोबाइल मालकाशी संपर्क कसा साधावा? हा प्रश्न रिक्षाचालक यमगरला पडला. याबाबत यमगर यांनी खारघर वाहतूक शाखेचे पोलीस नाईक संभाजी कोळेकर यांच्याशी संपर्क साधून हा प्रकार सांगितला. कोळेकर यांनी याबाबत नवी मुंबई क्राईम ब्रॅन्चचे आपले सहकारी पोलीस नाईक संदीप वाघमोडे यांना हा प्रकार सांगितला. वाघमोडे यांनी मोबाइल मालकाचा पत्ता ट्रेस करून संपर्क साधला. मोबाइल मालक पनवेल शहरातील रहिवासी असल्याचे निष्पन्न झाल्यावर खारघर वाहतूक शाखेजवळ मालकास तो परत देण्यात आला. यावेळी रिक्षाचालक हनमंत विठ्ठल यमगर, खारघर वाहतूक शाखेचे पोलीस नाईक संभाजी कोळेकर व मोबाइल मालक उपस्थित होते. तीस हजार किमतीचा मोबाइल रिक्षाचालकाने मोबाइल मालकाने रिक्षाचालकास ५०० रुपये बक्षीस स्वरुपात दिले व त्याचे कौतुक केले.
Comments
Popular posts
पनवेल जवळील पाच पीर डोंगर येथे ट्रेकींगसाठी जावून भरकटलेल्या ८ पर्यटकांना पनवेल शहर पोलिस व स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने केले रेस्क्यु..
Image
दुबईतुन गुंतवणुकीचे खोटे आमिष देणाऱ्या टोळीतील एका आरोपीस "सायबर सेल" पनवेल यांनी शिताफीने केले जेरबंद ..
Image
पनवेल शहर परिसरातील चर्चमधील चोरीचे गुन्हे उघडकीस ; पनवेल शहर पोलिसांची धडक कारवाई..
Image
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले बाळासाहेब ठाकरे राज्यस्तरीय फिल्म फेस्टिवलच्या पोस्टरचे अनावरण..
Image
शेतकऱ्यांना सरसकट कर्ज माफी मिळण्यासाठी पनवेल शहर जिल्हा कॉंग्रेसतर्फे आंदोलन..
Image