कॉपर आर्थिंगच्या पट्ट्यांची चोरी...
कॉपर आर्थिंगच्या पट्ट्यांची चोरी

पनवेल दि.०१ (वार्ताहर) : तालुक्यातील भाताण येथील अमिटी विद्यापीठ परिसरात असलेल्या सब स्टेशन मीटर रूममध्ये असलेली कॉपर आर्थिंगच्या पट्ट्यांची झाल्याची घटना घडली आहे.

भाताण, अमिटी विद्यापीठ परिसरात असलेल्या सब स्टेशन मीटर रूम मध्ये दोन मीटर बॉक्सचे अंदाजे २० हजार रुपये किमतीचे एकूण बारा कोपर अर्थिंग पट्ट्या अज्ञात चोरट्यांनी चोरून नेले आहेत. याप्रकरणी पनवेल तालुका पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Comments