विद्यार्थी गुणगौरव व स्नेहसंमेलन सोहळा साजरा..

विद्यार्थी गुणगौरव व स्नेहसंमेलन सोहळा साजरा


पनवेल / वार्ताहर -  : वैश्य वाणी समाज मंडळखोपोली शहर यांच्यातर्फे विद्यार्थी गुणगौरव व स्नेहसंमेलन सोहळा खोपोली येथे आयोजित करण्यात आला होता. समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार आणि स्नेहसंमेलन तसेच सत्तर वर्षावरील जेष्ठ नागरिकांचा सत्कार समारंभ यावेळी करण्यात आला. श्रीराम मंगल कार्यालयखोपोली येथे हा स्नेहसंमेलन सोहळा उत्साहात सारा झाला. 

        यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून शिवसेना मुरबाड नगरपंचायतचे गटनेता नितीन लक्ष्मण तेलवणेनगरसेविका नम्रता नितीन तेलवणेमिसेस टुरिझम ग्लोब 2022 ची विजेती हर्षला तांबोळीउद्योजक योगेश तांबोळीसरपंच देवन्हावे अंकित साखरेउपसरपंच संदेश चौधरी, वैश्यवाणी समाज एक हात मदतीचा अध्यक्ष प्रदीप दलाल यांच्यासह संतोष चौधरी अध्यक्षहेमंत तेलवणे उपाध्यक्षअनिल चौधरी सेक्रेटरीदत्तात्रय चौधरी खजिनदारकार्यकारणी मंडळ खोपोली शहर वैश्य वाणी समाज उपस्थित होते. वैश्य वाणी समाज एकत्रित यावा यासाठी स्नेहसंमेलन सोहळा करण्यात आला होता. या कार्यक्रमाला अनेकांनी उपस्थिती दर्शवली. यावेळी मान्यवरांनी आपल्या मनोगत व्यक्त करून समाजासाठी जे काही लागेल ते देण्याची तयारी दर्शवली. समाजातील नागरिक पुढे कसे जातील यासंबंधी मार्गदर्शन केले. पोलीस उपनिरीक्षक अलोक खिसमतराव यांचा विशेष सत्कार यावेळी करण्यात आला. यावेळी पैठणीचा खेळ खेळण्यात आला. महिला पैठणीच्या मानकरी मनाली महेश पोटे ह्या ठरल्या. त्यांना पैठणी भेट देण्यात आली. या स्नेहसंमेलनाला महिलांची विशेष उपस्थिती होती.

Comments