मंदिरासह बंद घरात चोरी...
मंदिरासह बंद घरात चोरी...

पनवेल दि. ०३ ( वार्ताहर ) : नवीन पोलीस स्टेशन कार्यक्षेत्रातील आपटा फाटा येथील श्री स्वामी समर्थ मंदिर व जवळील इमारतीमधील एक घरामध्ये चोरी झाली आहे. 
                        चोरट्यांनी दानपेटीसह बंद घरातील १ लाख रुपयांचे दागिने चोरून नेले आहेत. दानपेटीमध्ये नक्की किती रक्कम होती हे निश्चित नसल्याने किती ऐवज चोरीला गेला हे स्पष्ट झालेले नाही. या दोन्ही घटनांविषयी नवीन पनवेल पोलीस स्टेशनमध्ये घरफोडीचा गुन्हा दाखल झाला आहे.
Comments