रोख रकमेसह दागिन्यांची बॅग लंपास..
रोख रकमेसह दागिन्यांची बॅग लंपास

पनवेल / दि.०६ (संजय कदम) : पनवेल बस स्टॅन्ड येथून रोख रकमेसहसोन्याच्या दागिन्यांची बॅग लंपास झाल्याची घटना घडली आहे. 
मनसुख पिरखाँ पठाण यांच्याकडे असलेल्या बॅगेमध्ये रोख रकमेसह सोन्याचे दागिने असा मिळून ६१ हजार ५०० रुपये किमतीचा ऐवज ठेवला होता ते पनवेल बस स्टॅन्ड येथे आले व त्यानंतर त्यांनी त्यांच्या पत्नीजवळ सदर बॅग ठेवून जवळील रिक्षा स्टॅन्ड येथे रिक्षा आणण्यासाठी गेले असता त्यादरम्यानच्या काळात अज्ञात चोरट्याने सदर बॅग चोरून नेल्याने या बाबतची तक्रार पनवेल शहर पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे.
Comments