मुंबई पुणे एक्सप्रेस हायवेवर कारची कंटेनरला धडक...
मुंबई पुणे एक्सप्रेस हायवेवर कारची कंटेनरला  धडक...

पनवेल वैभव / दि.०१ (संजय कदम) : मुबई पुणे एक्सप्रेस हायवेवर खान्देश्वर येथे एका हुंडई कारची कंटेनरला पाठीमागून धडक झालेल्या अपघातात सुदैवाने जीवितहानी टळली आहे मात्र कारचे मोठे नुकसान झाले आहे.  

कर्नल BK सक्सेना (वय 71वर्षे, रा. हडपसर पुणे) हे आपल्या ताब्यातील हुंडई कार क्रं MH 12TN 5381 घेऊन पुणे वरून मुंबईकडे जात असताना खान्देश्वर परिसरात त्यांचा गाडीवरील ताबा सुटून त्यांनी तिसऱ्या लेन वरून जाणारा कंटेनर क्र MH 46AR4520 ला पाठीमागून धडक दिली. सदर अपघातामध्ये सुदैवाने कोणालाही दुखापत नाही मात्र कारचे मोठे नुकसान झाले आहे. यावेळी महामार्ग पोलीस केंद्र पळस्पेचे पोलीस उपनिरिक्षक गणेश बुरुकुल आणि महामार्ग पळस्पे मोबाईलचे स्टाफ यांनी तात्काळ अपघाताच्या ठिकाणी जाऊन  अपघातग्रस्त वाहन खाजगी क्रेनच्या साह्याने रस्त्याच्या कडेला घेऊन वाहतूक सुरळीत चालू केले. 

फोटो : अपघातग्रस्त वाहन
Comments