न्यू मॅरीटाईम अँड जनरल कामगार संघटनेतर्फे शेलघर मध्ये पत्रकार परिषद...


दिवाळीनिमित्त पत्रकारांशी साधला संवाद


उरण /  दि 24 : -  न्यू मॅरिटाईम अँण्ड जनरल कामगार संघटना ही कामगार क्षेत्रातील अत्यंत नामवंत व सुप्रसिद्ध व विश्वसनीय अशी कामगार संघटना असून दरवर्षी या संघटनेचा विकासाचा आलेख उत्तरोत्तर वाढतच आहे अशा या संघटनेतर्फे दिवाळीनिमित्त दरवर्षी पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात येते.पत्रकारांशी संवाद साधण्याच्या दृष्टीने न्यू मॅरिटाईम अँन्ड जनरल कामगार संघटनेच्या वतीने सोमवार दि 24 ऑक्टोबर 2022 रोजी सकाळी 11 वाजता स्व. जोमा नारायण घरत समाज मंदिर हॉल शेलघर येथे पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते.

पत्रकारांशी संवाद साधताना संघटनेचे सरचिटणीस वैभव पाटील यांनी पत्रकार परिषद घेण्या पाठमागची भूमिका स्पष्ट करून उपस्थित पत्रकारांशी संवाद साधला. कामगार संघटनेविषयी उपस्थित पत्रकारांना माहिती दिली. संघटनेचे कार्याध्यक्ष पी. के रमण यांनी संघटनेची घौड‌दौड कशी झाली हे सांगत संघटनेची माहिती पत्रकारांना दिली. शेवटी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष महेंद्र घरत यांनी पत्रकारांशी संवाद साधला न्यू मॅरिटाईम ॲन्ड जनरल कामगार संघटनेचे 161 हून जास्त यूनिट, 12910 हून अधिक सभासद संख्या, नविन यूनिट-9 तर  पगारवाढीचे 14 करार करण्यात आल्याचे सांगत संघटनेच्या या घौड‌दौड मध्ये, संघटनेच्या प्रगतीमध्ये पत्रकारांचेही महत्त्वाचे योगदान आहे. पत्रकारांचे योगदान संघटनेसाठी महत्वपूर्ण आहे. पत्रकारांचे योगदान विसरून चालणार नाही असे सांगत पत्रकारांच्या कार्याचे कौतूक केले. तसेच न्यू मॅरिटाईम ॲन्ड जनरल कामगार संघटना सदैव पत्रकारांच्या सोबत असेल, पत्रकारांच्या सुख दुःखात सहभागी असेल असे यावेळी सांगितले. संघटनेच्या यशात पत्रकारांचे महत्त्वाचे योगदान असल्याने त्यांच्याप्रती आदर राखत दरवर्षी दिवाळीत पत्रकार परिषद घेऊन पत्रकारांशी संवाद साधला जातो असेही महेंद्र घरत यांनी यावेळी सांगितले. 

यावेळी व्यासपीठावर कामगार नेते महेंद्र घरत सरचिटणीस वैभव पाटील, कार्याध्यक्ष पी. के.रमण, व्हाईस प्रेसिडेंट किरीट पाटील , यूथ प्रेसिडेंट - लंकेश ठाकूर, ज्येष्ठ पत्रकार माधव पाटील, ज्येष्ठ पत्रकार दा. चा. कडू आदि मान्यवर यावेळी उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी उरण तालुका  इंटक अध्यक्ष संजय ठाकूर, युवक अध्यक्ष राजेंद्र भगत,संघटक - अनंत ठाकूर,सरचिटणीस अगंद ठाकूर, संघटक - प्रांजल भोईर, अरुण म्हात्रे, संघटक योगेश रसाळ,सरचिटणीस आदित्य घरत आदींनी विशेष मेहनत घेतली. शेवटी संघटनेचे अध्यक्ष महेंद्र घरत यांच्या हस्ते पत्रकारांना मिठाईचे वाटप करण्यात आले. यावेळी उरण पनवेल तालुक्यासह रायगड जिल्ह्यातील तसेच नवी मुंबई मधील पत्रकार मोठया संख्येने उपस्थित होते.

Comments
Popular posts
पनवेल जवळील पाच पीर डोंगर येथे ट्रेकींगसाठी जावून भरकटलेल्या ८ पर्यटकांना पनवेल शहर पोलिस व स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने केले रेस्क्यु..
Image
दुबईतुन गुंतवणुकीचे खोटे आमिष देणाऱ्या टोळीतील एका आरोपीस "सायबर सेल" पनवेल यांनी शिताफीने केले जेरबंद ..
Image
पनवेल शहर परिसरातील चर्चमधील चोरीचे गुन्हे उघडकीस ; पनवेल शहर पोलिसांची धडक कारवाई..
Image
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले बाळासाहेब ठाकरे राज्यस्तरीय फिल्म फेस्टिवलच्या पोस्टरचे अनावरण..
Image
शेतकऱ्यांना सरसकट कर्ज माफी मिळण्यासाठी पनवेल शहर जिल्हा कॉंग्रेसतर्फे आंदोलन..
Image