सा.रायगड पनवेल हा दिवाळी अंक माहितीने परिपूर्ण - वपोनि विजय कादबाने..
सा.रायगड पनवेल हा दिवाळी अंक माहितीने परिपूर्ण - वपोनि विजय कादबाने

पनवेल / दि २० (संजय कदम) : पनवेल मधून सातत्याने प्रसिद्ध होणारे  सा. रायगड पनवेल हा दिवाळी अंक यंदाही सर्व माहिती पूर्ण आहे वाचनीय आहे  वेगवेगळ्या प्रकारच्या माहिती यात असल्याने निश्चितच संतोष भगत यांचा हा अंक सुद्धा परिपूर्ण नटलेला असल्याचे प्रतिपादन पनवेल शहर पोलीस ठाण्याचे वपोनि विजय कादबाने यांनी या अंकाच्या प्रकाशनावेळी केले. 
                         यावेळी पनवेल शहर पोलीस ठाण्याचे वपोनि विजय कादबाने यांच्यासह सा. रायगड पनवेल चे संपादक संतोष भगत, पोलीस कर्मचारी माधव शेवाळे, पत्रकार संजय कदम, दीपक महाडिक, अनिल भोळे, अनिल कुरघोडे, रवींद्र गायकवाड, असीम शेख या पत्रकार बांधवांसह मनसेचे पराग बालड आदी उपस्थित होते. यावेळी शुभेच्छा देताना वपोनि विजय कादबाने यांनी सांगितले कि, सा. रायगड पनवेल या अंकाचे हजार अंक आगामी काळात निघावेत अशा महत्वपूर्ण शुभेच्छा त्यांनी यावेळी दिल्या. कार्यक्रमाचे प्रास्ताविक पत्रकार संजय कदम यांनी केले. 
फोटो - सा. रायगड पनवेल ह्या दिवाळी अंकाचे प्रकाशन करताना वपोनि विजय कादबाने यांच्यासह पत्रकार बांधव (छाया - चेतन पोपटा)
Comments
Popular posts
नगरसेविका ममता प्रितम म्हात्रे यांच्या मार्गदर्शनाखाली “सखी कर्तृत्वाचा सन्मान” उत्साहात...
Image
२४ तासाचे आत घरफोडीचे ३ आरोपी अटक करून गुन्हे शाखेने ३६ लाख किंमतीचे दागिने केले हस्तगत...
Image
शिवसेना(उद्धव बाळासाहेब ठाकरे)ग्राहक संरक्षण कक्षातर्फे घरगुती गॅस सिलेंडरचा पुरवठा वेळेवर करण्याची गॅस एजन्सीकडे मागणी ....
Image
मेडिकव्हर हॉस्पिटलमध्ये स्पाइन क्लिनिक सुरू ; पाठदुखी - मणक्याच्या विकारांवर तज्ञांकडून प्रभावी उपचार..
Image
गॅस दरवाढी विरोधात प्रतिकात्मक सिलेंडरची अंत्ययात्रा ; केंद्र व राज्यशासनाचा काँग्रेसकडून निषेध मोर्चा...
Image