माँसाहेब सौ.मीनाताई ठाकरे यांच्या स्मृती दिनानिमित्त पनवेल शहर शिवसेना शाखेतर्फे वाहण्यात आली आदरांजली...
शिवसेना शाखेतर्फे वाहण्यात आली आदरांजली...
 

पनवेल दि ०६, ( संजय कदम): तमाम शिवसैनिकांच्या लाडक्या माँसाहेब सौ मीनाताई ठाकरे यांच्या २६ व्या स्मृती दिनानिमित्त पनवेल शहर शिवसेना शाखे तर्फे आज शिवसैनिकांच्या वतीने आदरांजली वाहण्यात आली. 
                 
यावेळी पनवेल शिवसेना शहर प्रमुख प्रवीण जाधव, महिला आघाडी उपतालुका संघटक श्रीमती सुंनदा पाटील, शहर संघटिका अर्चना कुळकर्णी, उपशहर संघटिका उज्वला गावडे, उप महानगर संघटक अच्युत मनोरे, मा.नगरसेवक विश्वास म्हात्रे, उपशहर प्रमुख सुजन मुसलोंडकर, शैलेश जगनाडे, शाखा प्रमुख चंद्रकांत शिर्के, भास्कर पाटील आदींच्या उपस्थितीत आदरांजली वाहण्यात आली त्याच प्रमाणे तालुक्यात फळे वाटप, अन्नदान, भजन-  कीर्तनाचे कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते
 
फोटो  -   माँ साहेब सौ मीनाताई ठाकरे यांच्या स्मृती दिनानिमित्त पनवेल शहर शिवसेना शाखे तर्फे आदरांजली वाहताना पदाधिकारी
Comments