खारघर, तळोजा परिसरामध्ये पनवेल महानगर पालिकेच्या अतिक्रमण पथकाची फेरीवाल्यांवर कारवाई..
अतिक्रमण पथकाची फेरीवाल्यांवर कारवाई..


पनवेल दि.१२(वार्ताहर): खारघर आणि तळोजामधील रस्त्यांवर ठाण मांडलेल्या अनधिकृत फेरीवाले आणि रस्त्याच्या कडेला उभारलेल्या होर्डिंगवर पालिकेने कारवाई केली. तळोजा वसाहतीच्या प्रवेशद्वार असलेल्या रस्त्याच्या कडेला मोठ्या प्रमाणात अनधिकृत होर्डिंग उभारण्यात आले होते. याला लागूनच नवी मुंबई मेट्रो जात असल्यामुळे सदर रस्त्याला विद्रुपचे स्वरूप आले होते. तसेच काहींनी अनधिकृत शेड उभारून व्यवसाय थाटला होता. खारघर सेक्टर ३४ कडून तळोजाकडे तसेच सत्यसाई संजीवनी रुग्णालय आणि अमनदूत मेट्रो स्थानकाकडे जाणाऱ्या रस्त्याच्या कडेला गणेशोत्सवामध्ये पक्के शेड उभारले होते. त्याचबरोबर शीघ्र कृती 4 दल समोरील सिग्नललगत मटण विक्रेत्यांनी शेड उभारले होते. 
                     दरम्यान, मेट्रो पुलालगत मोठ्या प्रमाणात लावण्यात आलेल्या होर्डिंग्जमुळे सिडको अधिकाऱ्यांनीही नाराजी व्यक्त केली होती. खारघर आणि तळोजामध्ये रस्ते अडवून व्यवसाय सुरू करणाऱ्यांवर पालिकेचे प्रभाग अधिकारी जितेंद्र मढवी यांच्या उपस्थितीत जेसीबीच्या साह्याने अनधिकृत होर्डिंग व फेरीवाल्यांची दुकाने जमीनदोस्त करण्यात आल्याने नागरिक समाधान व्यक्त करीत आहेत
Comments
Popular posts
महापालिकेच्यावतीने बावन बंगला परिसरातील अनधिकृत बांधकामांवर तोडक कारवाई...
Image
कमल गौरी हिरु पाटील शिक्षण संस्थेच्या २८ व्या वर्धापनदिन दिनानिमित्त बबनदादा पाटील कॉलेज ऑफ फिजिओथेरपीचे होणार थाटात उद्घाटन...
Image
आमदार विक्रांत पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त पनवेल विधानसभा क्षेत्रात सामाजिक उपक्रमांची मालिका; 'बुके' नव्हे 'बुक' संकल्पनेतून सामाजिक बांधिलकी जपत वाढदिवस साजरा...
Image
आईशा मदरसा तर्फे रुग्णवाहिका लोकार्पण सोहळा संपन्न ...
Image
आमदार विक्रांत पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त प्रभुदास भोईर यांच्यावतीने रस्ता सुरक्षा जनजागृती कार्यक्रम ...
Image