पनवेल शाळेतील मुलांसाठी इनर व्हीलतर्फे नवरात्रौत्सव...
पनवेल शाळेतील मुलांसाठी इनर व्हीलतर्फे नवरात्रौत्सव

पनवेल दि. ३० (वार्ताहर ) :  रयत शिक्षण संस्था, मार्केट यार्ड, पनवेल येथे आज इनर व्हील क्लब ऑफ पनवेल इंडस्ट्रीयल टाऊन च्या वतीने नवरात्रोत्सव निमित्त शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना दुपारचे सुग्रास भोजन आणि प्रसाद म्हणून फळे देण्यात आली. यासाठी येणारा प्रमुख खर्च प्रेसिडेंट कल्पना नागावकर आणि क्लब संस्थापिका वृषाली सावळेकर यांनी दिला.
                  पौगंडावस्थें मधील विद्यार्थी, विद्यार्थिनीसाठी  ॠेेव र्ढेीलह - इरव र्ढेीलह याबद्दल आणि  मासिक पाळी बद्दल  शारीरिक  स्वच्छता व  काळजी कशी घ्यावी याबद्दल डॉ. मनीषा कांबळे आणि डॉ. राजश्री बागडे यांनी उत्तम मार्गदर्शन केले. यानंतर नवरात्री उत्सव चालू असल्यामुळे विद्यार्थिनींसाठी भोंडला गाणी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.याचा सर्वांनी मनसोक्त आनंद लुटला. डॉ. साधना गांधी यांनी सामान्यज्ञान विषयची पुस्तकं मुलांना भेट दिली.   शाळेचे प्राचार्य श्री प्रक्षाळे सर, प्रतिभा लादे आणी सर्व शिक्षक वर्ग यांनी खुप मेहनत घेतली.  क्लब अध्यक्ष कल्पना नागावकर , सचिव सई पालवणकर, क्लब संस्थापिका वृषाली सावळेकर, माजी अध्यक्ष शुभांगी वालेकर , डॉ.मनीषा कांबळे, डॉ. राजश्री बागडे, डॉ. साधना गांधी,  रेखाताई कांडपिळे, ज्योती गुंदेचा, वैशाली ठाकरे, मोहिका भुजबळ या क्लब मेंबर्सच्या उपस्थितीत हा कार्यक्रम थाटात संपन्न झाला.

फोटो - पनवेल शाळेतील मुलांसाठी इनर व्हीलतर्फे नवरात्रौत्सव
Comments