रिक्षा चालका विरोधात गुन्हा दाखल ...
रिक्षा चालका विरोधात गुन्हा दाखल 


पनवेल दि. ३० (वार्ताहर ) :   रिक्षा चालकाने एका महिलेचा विनयभंग केल्याचा प्रकार साईनगर पनवेल येथे घडला आहे. या प्रकरणी रिक्षा चालका विरोधात  पनवेल शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 
                ३६ वर्षीय महिला या चारचाकी वाहनातून जात होत्या. यावेळी त्यांच्या विरुद्ध दिशेने येणाऱ्या रिक्षा चालकाने गाडी मागे घे, या कारणावरून त्यांच्याच शाब्दिक बाचाबाची चालू झाली. यावेळी रिक्षा चालकाने पीडित महिलेचा विनयभंग केला. तसेच शिवीगाळ केली. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Comments