करंजाडेतील समस्यांबाबत लवकरच आढावा बैठक लावण्याचे आ.जयंत पाटील यांचे आश्वासन..
पनवेल परिसरातील शेकापचा सच्चा कार्यकर्ता.. आमदार जयंत पाटील..
पनवेल -- पनवेल परिसरातील शेतकरी कामगार पक्षाचा बालेकिल्ला राखून पक्षाशी गद्दारी न करता  शेतकरी कामगार पक्षाशी एकनिष्ठ असलेला सच्चा कार्यकर्ता म्हणजे करंजाडे वसाहतीचा सरपंच रामेश्वर आंग्रे होय. असे उदगार शेकाप चे आमदार जयंत पाटील यांनी काढले. आ.पाटील यांनी करंजाडे येथील शेकाप पुरस्कृत गरबा दांडिया 2022 ला भेट दिली. यावेळी सरपंच रामेश्वर आंग्रे तसेच उपसरपंच योगेंद्र कैकाडी यांनी पाटील यांचे पुष्पगुछ देऊन सन्मान केला. यावेळी माजी नगराध्यक्ष जे.एम.म्हात्रे, गणेश कडू, राजेश केणी यांच्यासह कार्यकतें उपस्तित होते.

करंजाडे वसाहतीतील सेक्टर 4 येथील साकार अकॅडमि मैदानावर नवरात्रोस्तवानिमिताने शेकाप पुरस्कृत गरबा दांडिया 2022 चे आयोजन करण्यात आले आहे. माजी नगराध्यक्ष जे.एम.म्हात्रे, विरोधीपक्षनेते प्रीतम म्हात्रे यांच्या मार्गदर्शनाखाली शेकापचे करंजाडे वसाहतीचे डॅशिंग व युवकांचे प्रेरणास्थान असलेले सरपंच रामेश्वर आंग्रे त्याचबरोबर त्याच्या साथीला साथ देणारे उपसरपंच योगेंद्र कैकाडी यांनी या कार्यक्रमादरम्यान कोणताही अनुसुचित प्रकार घडु नये यासाठी महिलासाठी, मुलांसाठी तसेच लहान मुलासाठी असे वेगवेगळी दांडिया खेळण्यासाठी जागा उपलब्ध करून दिली आहे. या नवरात्र कार्यक्रमाला वेगवेगळ्या संघटनेचे पदाधिकारी, सामाजिक क्षेत्रातील, जेष्ठ नागरिक, राजकीय त्याचबरोबर पत्रकारांनी भेटी दिल्या. त्याचबरोबर शेकापचे आमदार भाई जयंत पाटील यांनी देखील या दांडिया गरबा उत्सवाला नुकतीच भेट दिली. यावेळी या कार्यक्रमाच्या नियोजनाबद्दल रामेश्वर आंग्रे तसेच योगेंद्र कैकाडी यांचे पाटील यांनी कौतुक केले. त्याचबरोबर एका पक्षातून दुसऱ्या पक्षात जाणाऱयांची कमी नाही. मात्र "रामेश्वर आंग्रे" हा शेतकरी कामगार पक्षाशी एकनिष्ठ असलेला सच्चा कार्यकर्ता असल्याचे उदगार आमदार पाटील यांनी यावेळी काढले.

करंजाडेतील समस्यांबाबत लवकरच बैठकीचे आयोजन - आमदार - पाटील

यावेळी आंग्रे यांनी करंजाडे वसाहतीला भेडसावणाऱ्या समस्यांचा पाढा वाचला. सिडकोकडून कोणतेही सुविधा आजपर्यत या वसाहतीला दिलेली नाही. त्याचबरोबर प्रत्येक समस्यांकरिता सिडकोबरोबर नागरिकांना एकप्रकारे युद्ध करावे लागत आहे. यामध्ये रस्त्यावर पडलेले खड्डे, पाणी, वीज, हक्काचे मैदान, गार्डन अश्या विविध सुविधा सिडकोने दिलेल्या नाहीत, यावेळी आमदार जयंत पाटील यांनी लवकरच करंजाडेतील समस्यांबाबत आढावा बैठक लावण्याचे आश्वासन यावेळी दिले.
Comments
Popular posts
बोलघेवड्या योजनांचा भांडाफोड प्रत्यके शिवसैनिकांनी घराघरात जाऊन केला पाहिजे- पुणे संपर्क प्रमुख व आ.सचिन अहिर
Image
पर्यावरण पूरक गणेश उत्सव ; हाच खरा गणेश उत्सव - सुप्रसिद्ध डॉ.गिरीश गुणे
Image
पनवेल शहर जिल्हा राष्ट्रवादी युवक काँग्रेस कार्यकारिणी जाहीर ; महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी युवक काँग्रेस अध्यक्ष महेबूब शेख यांची प्रमुख उपस्थिती
Image
रोटरी क्लब ऑफ पनवेल सेंट्रलतर्फे "सेवाश्री" पुरस्काराने प्रितम म्हात्रे सन्मानित..
Image
केदार भगत मित्र परिवार यांच्या "गणपती आरती संग्रह पुस्तकाचे मा.खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्याहस्ते प्रकाशन...
Image