स्कूल बसला लागली आग ; जीवीत हानी नाही..
स्कूल बसला लागली आग ; जीवीत हानी नाही
पनवेल दि.12 (वार्ताहर): खारघर येथे एका स्कूल बसला भीषण आग लागल्याची घटना सोमवारी दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास घडली आहे. परंतु सुदैवाने जीवीन हानी झाली नसल्याची माहिती मिळत आहे. 
                    पिपल्प ऐज्युकेशन सोसायटीची ही स्कूल बस आहे. ही घटना खारघर से्नटर 15 येथील गुडवील इमारती समोर घडली आहे. आगीची माहीती मिळतात अग्नीशमन घटना स्थळी दाखल होत त्यांनी शर्तीचे प्रयत्न करुन त्वरीत आग विझवली. विद्यार्थ्यांना वेळीच बाहेर काढल्याने मोठी दुर्घटना टळली आहे. पनवेल व नवी मुंबई परिसरात वारंवार होणाऱ्या या आगीच्या घटनांमुळे मुलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐैरणीवर आला आहे.

फोटो: बसला लागलेली आग.
Comments