घरफोडीत ९ लाखांचा ऐवज लंपास...
घरफोडीत ९ लाखांचा ऐवज लंपास


पनवेल, दि.२१(वार्ताहर) पनवेल तालुक्यातील बारापाडा गावामध्ये अज्ञात चोरट्यांनी केलेल्या घरफोडीत ९ लाख रुपयांचा ऐवज लंपास केल्याची घटना घडली आहे.
    तालुक्यात चोरीच्या घटना दिवसेंदिवस वाढत आहेत. चोरी करण्यासाठी चोरटे नवनवीन क्लुप्त्या काढीत आहेत. पनवेल तालुक्यातील बारापाडा गावात एका घरात घुसून 13 ते 15 तोळे सोन्याचे दागिने आणि जवळपास दीड लाखांची रोकड चोरटयांनी लंपास केला आहे. रात्री ३च्या सुमारास अज्ञात चोर घरावर चढून घराची कौले काढून आत प्रवेश केला. घरातील कपाट फोडून त्यात असणारे 13 ते 15 तोळे सोन्याचे दागिने आणि जवळपास दीड लाखांची रोकड चोरटयांनी लुटली आहे. पनवेल पोलीस पुढील तपास करत आहेत.
Comments