सोन्याची चेन खेचून चोरटे पसार...
सोन्याची चेन खेचून चोरटे पसार..


पनवेल दि. ३० (वार्ताहर ) :   सायकलला अडकलेली काडी काढत असताना स्कुटीवर आलेल्या चोरट्यांनी एका मुलीच्या गळ्यातील सोन्याची चेन जबरीने चोरून ते पसार झाले आहेत. 
      गणेश भगत (राहणार करंजाडे गाव) यांची मुलगी टाटा पॉवर इलेक्ट्रिक स्टेशनजवळ सेक्टर चार, करंजाडे येथे सायकलने घरी येत होती. ती सायकलला अडकलेली काडी काढत असताना स्कुटीवर आलेल्या चोरट्यांनी तिच्या गळ्यातील सहा ग्रॅम वजनाची सोन्याची चेन जबरीने खेचून ते पळून गेले . या प्रकरणी पनवेल शहर पोलीस अधिक तपास करत आहेत.
Comments