गौरा गणेशोत्सवामध्ये विसर्जनासाठी रात्री बारा वाजेपर्यंत परवानगी देण्यात यावी- शिवसेना महानगर प्रमुख(शिंदे गट)ऍड. प्रथमेश सोमण ..
शिवसेना महानगर प्रमुख(शिंदे गट)ऍड. प्रथमेश सोमण 

पनवेल दि.१२ (वार्ताहर):  गौरा गणेशोत्सवामध्ये विसर्जनासाठी रात्री बारा वाजेपर्यंत परवानगी देण्यात यावी, अशी मागणी पनवेल शिवसेना महानगरप्रमुख अॅड. प्रथमेश सोमण यांनी केली आहे. या संदर्भात त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना निवेदन दिले आहे. रायगड जिल्ह्यात व विशेष करून पनवेलमध्ये गौरा गणपती (साखरचौथ गणपती) साजरा करण्याची विशेष परंपरा आहे. मुख्य गणेशोत्सवातील दहा दिवसांच्या गणपतीचे विसर्जन झाल्यानंतर पितृपंधरावड्यातील येणाऱ्या चतुर्थीला गणपतीची प्रतिष्ठापना करून दुसऱ्या दिवशी विसर्जन करण्याचा प्रघात आहे. ह्या उत्सवाची परंपरा पनवेलमध्ये वर्षानुवर्षे साजरी केली जात आहे. पनवेल मध्ये असा गणेशोत्सव साजरा करणाऱ्या नोंदणीकृत मंडळांची संख्या 75 च्या वर असून अनेक नागरिक घराघरातदेखील या गणेशोत्सवाचे पालन करतात. हा दीड दिवसाचा गणेशोत्सव
                  यावर्षी मंगळवारी (दि. 13) साजरा होत असून बुधवारी (दि. 14) विसर्जन होणार आहे. सामान्यतः या विसर्जन मिरवणुकांना रात्री 10 वाजेपर्यंत प्रथेप्रमाणे परवानगी असते, परंतु गेली दोन वर्षे कोविडमुळे ही परंपरा खंडित झाली आहे. मंडळांना उत्सव साजरे करता आले नाहीत. तथापि आता आपले हिंदुत्ववादी व लोकाभिमुख सरकार अस्तित्वात आले आहे म्हणूनच पनवेलच्या या अनोख्या परंपरेत गणेश विसर्जनाची मर्यादा रात्री बारा वाजेपर्यंत वाढवण्यात यावी अशी मागणी पनवेलकर नागरिक गणेश भक्त व शेकडो मंडळाच्या प्रतिनिधीमार्फत मी आपणास करीत आहे. मावळचे संसदरत्न खासदार श्रीरंग आप्पा बारणे यांनाही ही मागणी केली असून याबाबतीत योग्य तो पाठपुरावा करण्याचे आश्र्वासन त्यांनी दिले आहे. कृपया संबंधित जिल्हाधिकारी व पोलीस आयुक्त यांना योग्य ते आदेश पारित करावेत ही विनंती, असे सोमण यांनी निवेदनात नमुद केले आहे.  
फोटो:शिवसेना महानगर प्रमुख(शिंदे गट)ऍडव्होकेट प्रथमेश सोमण.
Comments
Popular posts
शिबिरात दिलेला शब्द उपचारापर्यंत जपला ; रुग्णांच्या भेटीला प्रितम म्हात्रे...
Image
रुग्णालयातून घरी गेल्यानंतर उपचारांसाठी मेडिकव्हरचा ‘होमवॉर्ड’ उपक्रम..
Image
गणेशोत्सव मंडपात गिरविले ‘सीपीआर’चे धडे ; मेडिकव्हर हॉस्पिटलतर्फे नागरिकांना सीपीआरचे प्रशिक्षण...
Image
नवीन पनवेल मध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) तर्फे एसटी स्मार्ट कार्ड वाटप...
Image
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर संस्कृती आणि परंपरेचा उत्सवी रंग ; ढोल-ताशांच्या गजरात अवतरली महाराष्ट्राची लोकसंस्कृती
Image