वाहतूक पोलीस नेमण्याची शिवसेनेची मागणी
पनवेल वैभव / दि ०८ (संजय कदम) : गणेश विसर्जन सुरळीत व शांततेत पार पडण्यासाठी पनवेल परिसरात वाहतूक पोलीस नेमण्याची मागणी शिवसेना पनवेल शहर प्रमुख प्रवीण जाधव यांनी वाहतूक शाखेकडे केली आहे.
येत्या ९ -९-२२ व १४-९-२२ रोजी गणपती तसेच गौरा गणपती विसर्जन निमित्ताने शहरातील बापटवाडा नाका, मिरची गल्ली नाका, जुने पोलीस स्टेशन परिसर व आदर्श हॉटेल परिसरात यावेळी मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत असते त्यामुळे विसर्जनास वेळ लागतो तरी याठिकाणी वाहतूक पोलीस ठेवणे गरजेचे आहे त्यामुळे याबाबत वाहतूक अधिकाऱ्यांनी लक्ष घालून सदर ठिकाणी वाहतूक पोलीस नेमण्यात यावे अशी मागणी शिवसेना पनवेल शहर प्रमुख प्रवीण जाधव यांनी वाहतूक शाखेकडे केली आहे.
फोटो - प्रवीण जाधव