बेकायदेशीररित्या भारतात प्रवेश करून वास्त्यव्य करणाऱ्या पाच बांग्लादेशींविरुद्ध पनवेल तालुका पोलिसांची कारवाई..
पनवेल तालुका पोलिसांची कारवाई..

पनवेल / दि ०८, (वार्ताहर):  बेकायदेशीररित्या भारतात प्रवेश करून वास्त्यव्य करणाऱ्या पाच  बांग्लादेशींविरुद्ध  पनवेल तालुका पोलिसांनी तालुक्यातील कोन गाव परिसरात कारवाई केली आहे. 
           कोणत्याही वैद्य प्रवासी कागदपत्राशिवाय अवैधरीत्या भारत- बांगलादेश सीमेवरून भारतीय हद्दीत घुसखोरी करून भारतात प्रवेश केला व पनवेल तालुक्यातील कोन हद्दीत पाच जण अनधिकृतरित्या वास्तव्य करत असल्याची माहिती पनवेल तालुका पोलीस ठाण्याचे वपोनी रविंद्र दौंडकर यांना मिळताच त्यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथकाने धडक कारवाई करत त्यांना ताब्यात घेतले आहे.
Comments