शिवसेना पनवेल महानगर संघटक पदी शशिकांत डोंगरे यांची नियुक्ती..
शिवसेना पनवेल महानगर संघटक पदी शशिकांत डोंगरे यांची नियुक्ती..

पनवेल दि. ०८ ( वार्ताहर ) : शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांच्या आदेशानुसार शिवसेना नेते सुभाष देसाई यांच्या मार्गदर्शनानुसार रायगड -पनवेल जिल्हाप्रमुख शिरीष घरत यांनी डॅशिंग शिवसैनिक शशिकांत डोंगरे यांची शिवसेना महानगर संघटक - पनवेल महानगर क्षेत्र म्हणून नियुक्ती करण्यात आल्याने शिवसैनिकांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे . 

                       मुंबईच्या मा. महापौर व शिवसेना नेत्या सौ. किशोरीताई पेडणेकर  यांच्या हस्ते त्यांना नियुक्ती पत्र देण्यात आले यावेळी संपर्क प्रमुख बबनदादा पाटील, सहसंपर्क प्रमुख रघुनाथ (भाई) शिंदे, जिल्हाप्रमुख शिरीष घरत, उरण जिल्हाप्रमुख मनोहरशेठ भोईर, निरीक्षक वैभव सावंत, रायगड जिल्हा समन्वयक अनिल चव्हाण, उपजिल्हाप्रमुख भरत पाटील, रामदास पाटील, विधानसभा संघटक दिपक निकम, तालुका संपर्क प्रमुख योगेश तांडेल, तालुका प्रमुख ज्ञानेश्वर बडे, एकनाथ म्हात्रे, विश्वास पेटकर, विधानसभा समन्वयक प्रदीप ठाकूर, महिला आघाडीच्या उपजिल्हासंघटिका सौ. कल्पनाताई पाटील, विधानसभा संघटिका सौ. रेवतीताई सकपाळ, तालुका संघटिका सौ. अनीता डांगरकर, सौ. मेघा दमडे, युवासेना उपजिल्हा अधिकारी अवचित राऊत, विधानसभा अधिकारी पराग मोहिते तसेच सर्व उपतालुका प्रमुख, शहर प्रमुख, विभाग प्रमुख, शाखा प्रमुख, उपशाखा प्रमुख, गट प्रमुख, बूथ प्रमुख आदि पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी बोलताना  शिवसेना महानगर संघटक - पनवेल महानगर क्षेत्राचे शशिकांत डोंगरे यांनी सांगितले की, पक्षश्रेष्टीनी जी जवाबदारी माझ्यावर टाकली आहे तिला योग्य तो न्याय देणार व पक्ष वाढीसाठी मेहनत घेणार असल्याचे त्यांनी सांगितले . 

फोटो - मुंबईच्या मा. महापौर व शिवसेना नेत्या सौ. किशोरीताई पेडणेकर यांच्या हस्ते पुष्पगुच्छ व शुभेच्छा स्वीकारताना  शशिकांत डोंगरे
Comments
Popular posts
देशाचे पुढचे राजकारण आपल्या मनासारखे होण्यासाठी इंडियाने एकरूप होऊन काम करावे लागेल - शिवसेना नेते मा.खासदार अनंत गीते..
Image
नैना हटाव शेतकरी बचाव अंतर्गत सिडकोविरोधातील शेतकऱ्यांच्या आमरण उपोषणाला शिवसेनेचा(उद्धव बाळासाहेब ठाकरे) सक्रिय पाठिंबा..
Image
बाबासाहेब लिगल पँथर संघटनेच्या नेतृत्वात पनवेलमध्‍ये प्रथमच भव्य संविधान सम्मान शोभायात्रा(मिरवणुक)संपन्न...
Image
१५ वर्षीय मुलाला कायदेशीर रखवालीतून नेेले पळवून...
Image
तुरमाळे येथील नैना विरोधातील आमरण उपोषणास भेट देत शिवसेना नेते मा.खासदार अनंत गीते यांनी दिला पाठींबा...
Image