मंडळात जुगार खेळण्यास विरोध केल्याने एका सदस्यास करण्यात आली मारहाण ...
मंडळात जुगार खेळण्यास विरोध केल्याने एका सदस्यास  करण्यात आली मारहाण 


पनवेल दि. ०५ ( वार्ताहर ) :  मंडळात जुगार खेळण्यास विरोध केल्याने एका सदस्यांस इतर चार सदस्यांनी शिवीगाळ करून मारहाण केल्याची घटना पनवेल शहरातील शिवाजी नगर झोपडपट्टी येथे घडली आहे . 
                        शिवाजी नगर युवक मित्र मंडळ या गणेशोत्सव मंडळाचे सदस्य असलेले आनंद गुरव (वय २९  ) यांनी जुगारासारखे अनुचित प्रकार मंडळात चालवू नका असे इतर सदस्यांना सांगितल्याने त्याचा राग मनात धरून इतर चार  सदस्यांनी त्याला शिवीगाळ करून मारहाण केल्याने याबाबत ची तक्रार पनवेल शहर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे .
Comments