श्री स्वामी समर्थांचे अध्यात्मिक विचार घराघरात पोहोचविण्याचे काम सा.रायगड मनोगतद्वारे होत आहे- मठाधिपती प.पू.गुरुवर्य श्री.श्री.108 महंत भाऊ सुधाकर घरत
पनवेल वैभव / दि.२१ (वार्ताहर) ः श्री स्वामी समर्थांचे अध्यात्मिक विचार घराघरात पोहोचविण्याचे काम गेल्या 21 वर्षापासून साप्ताहिक रायगड मनोगत हे दिवाळी अंकाद्वारे श्री स्वामी समर्थ अंक काढून करत असून ही एक अध्यात्मिक सेवा असल्याचे मत मठाधिपती प.पू.गुरुवर्य श्री.श्री.108 महंत भाऊ सुधाकर घरत यांनी पनवेल येथील गावदेवी पाडा मंदिराजवळील श्री स्वामी समर्थ मठात या अंकाच्या प्रकाशनावेळी केले.
यावेळी मठाधिपती प.पू.गुरुवर्य श्री.श्री.108 महंत भाऊ सुधाकर घरत यांच्यासह विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. यावेळी बोलताना प्रितम म्हात्रे यांनी सुद्धा सातत्याने अध्यात्मिक विचार घेवून हा दिवाळी अंक प्रकाशित होत असून आज या अंकाचे प्रकाशन माझ्या हस्ते करताना मला परमानंद होत आहे व एक स्वामी सेवा असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी सा.रायगड मनोगतचे कार्यकारी संपादक संजय कदम, शिवसेना (उबाठा) पक्षाचे शहरप्रमुख प्रवीण जाधव, महिला आघाडी संघटीका अर्चना कुळकर्णी, मनसेचे संदीप पाटील, ज्येष्ठ पत्रकार गणेश कोळी, प्रशांत शेडगे, राकेश पितळे, सुमंत नलावडे, अनिल कुरघोडे, रवींद्र गायकवाड, प्रतिक वेदपाठक, हनिफ कच्छी, दिनेश गिल्डा, नानू वाघे, संजय जोशी, मेघना संजय कदम, रुचा कदम, मिरा सप्रे, रुतिका जोशी, अर्चना देशमुख, प्रकाश घरत आदी उपस्थित होते.
फोटो ः श्री स्वामी समर्थ अंक प्रकाशन