दिवाळी निमित्त भव्य रांगोळी प्रदर्शन .....
रांगोळी प्रदर्शनाचे विषेश आकर्षण छत्रपती शिवाजी महाराज, लोकनेते रामशेठ ठाकूर, दशावतार, वासुदेव बळवंत फडके, रतन टाटा, देव आनंद व अन्य रांगोळ्या
पनवेल(प्रतिनिधी) व्ही के ७५ सामाजिक मंडळ आणि रंगदीप क्रिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने खास दिवाळी निमित्त भव्य रांगोळी प्रदर्शनाचे १८ आक्टोबर २०२५ रोजी माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या शुभ हस्ते भव्य दिव्य दिमाखामध्ये उदघाटन करण्यात आले सदर कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी म्हणून सीकेपी हॉलचे कार्यकारी सदस्य राजू गुप्ते हे देखील या कार्यक्रमास उपस्थित होते उदघाटन प्रसंगी व्ही के ७५ सामाजिक मंडळाचे सर्व सदस्य तसेच रंगदीप क्रिएशनचे सर्व कलाकार सदस्य व नागरिक उपस्थित होते.
रंगदीप क्रिएशन मधील सर्व कलाकारांना प्रोत्साहित करून त्यांच्या पुढील उत्तम वाटचालीस रामशेठ ठाकूर यांनी सत्कार करुन शुभेच्छा दिल्या तसेच व्ही के ७५ सामाजिक मंडळाने सदर उपक्रम हाती घेतला आहे याबद्दल त्यांचे कौतुक केले.
ह्या प्रदर्शनासाठी प्रमुख उदघाटक म्हणून रामशेठ ठाकूर यांना बोलण्याचे मुद्दाम प्रयोजन करण्यालोकनेते त आले होते व्ही के ७५ म्हणजेच दहा दोन तीन या पॅटर्नचे सन १९७५ चे दहावी एसएससी चे प्रथम मानकरी आम्ही सर्वजण विद्यार्थी विठोबा खंडाप्पा हायस्कूलचे विद्यार्थी असून त्यावेळी आम्हाला रामशेठ ठाकूर हे शिक्षक म्हणून लाभलेले होते आम्ही सर्व विद्यार्थी २५ वर्षांनी म्हणजेच २६ जानेवारी २००० रोजी एकत्र येऊन म्हणजे बरोबर २५ वर्षांनी हे मंडळ स्थापले त्यानंतर पुढील २५ वर्ष एक सामाजिक बांधिलकी या उद्देशाने काही सामाजिक कार्य करण्याचे ठरविले त्यामध्ये प्रमुख सामाजिक कार्य म्हणजे आतापर्यंत ५२ आदिवासी जिल्हा परिषद तसेच वस्तीगृहातील दुर्मिळ शाळांमध्ये की जिथे कुठलीही सामाजिक संस्था कार्य करण्यासाठी पोहोचत नाही अशा शाळांमध्ये जाऊन त्यांना त्यांच्या आवश्यकतेनुसार मदत करत आहोत आज २०२५ रोजी आमच्या मंडळाने २५ वर्षांमध्ये पदार्पण केलेले आहे मंडळातील सर्व सदस्य दहावी एसएससी होऊन ५० वर्षे पूर्ण होत आहेत आणि आम्हाला सन १९७५ साली लाभलेले रामशेठ ठाकूर यांचे अमृत महोत्सवी वर्ष असा त्रिवेणी संगम साधून रामशेठ ठाकूर यांचा ह्या निमित्ताने अमृत महोत्सवी सत्कार करण्याचे ठरविले आणि या रांगोळी प्रदर्शनाचे प्रमुख उदघाटक म्हणून त्यांना निमंत्रित करण्यात आले व त्यांचा सत्कार करण्यात आला असे व्ही के ७५ सामाजिक मंडळाच्या वतीने सांगण्यात आले.
या रांगोळी प्रदर्शनात गणपती - दिशा पाटील, व्हि.के.७५ symbol - शरयु घरत, लोकनेते रामशेठ ठाकूर - मनोज भोपी, कलावंती - योगेश्री ढमाले, कानिफनाथ महाराज - नेहा धामणकर, वात्सल्य - नेहा घरत, वैजयंती माला - प्रकाश नवाळे, दशावतार - योगेश्री ढमाले, वासुदेव बळवंत फडके - दिलीप शिगवण, हनुमान चालीसा - किर्ती,योगेश्री,
साईबाबा - डॉ. अमोल सलाग्रे, देवानंद - ज्ञानेश्वर कारेकर, रतन टाटा - डॉ. दिलीप शिगवण, शिवाजी महाराज - किर्ती घरत, कामधेनु - तन्वी भोपी, हनुमान - हिमांशु भोपी, राधा कृष्ण - रत्नेश घरत, कांतारा - कशिश तिखे, संस्कार भारती - शरयु घरत यांनी अशा रांगोळ्या काढल्या आहेत.
हे प्रदर्शन दिनांक १८ आक्टोबर २०२५ ते २६ ऑक्टोबर २०२५ पर्यंत सि.के.पी. हॉल, छत्रपती शिवाजी महाराज रोड, जूना आर्दश हॉटेल पनवेल येथे सर्वांसाठी विनामूल्य खुले ठेवण्यात आलेले आहे. तरी सर्वांनी अवश्य येऊन रंगोली प्रदर्शन पहावे असे आवाहन व्ही के ७५ सामाजिक मंडळाने केले.