आपल्या जवळच्या माणसांच्यासाथीने वाढदिवस साजरा करताना पुढे जगण्याची उर्मी मिळते - रमेश गुडेकर
पनवेल वैभव, दि.16 (वार्ताहर) ः आपल्या जवळच्या माणसाच्या साथीने वाढदिवस साजरा करताना पुढे अजून जगण्याची उर्मी मिळते व एक वेगळाच आनंद मिळतो असे प्रतिपादन शिवसेना सल्लागार रमेश गुडेकर यांनी आपल्या कुटुंबियांसह मित्र परिवाराच्या साथीने व पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या साथीने वाढदिवस साजरा करताना केले.
शिवसेना सल्लागार व मा.नगरसेवक, सामाजिक कार्यकर्ते रायगड भूषण रमेश गुडेकर यांचा वाढदिवस दरवर्षीप्रमाणे यंदाही मोठ्या उत्साहात त्यांच्या सहकार्यांनी साजरा केला. यावेळी विविध सामाजिक उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
याप्रसंगी त्यांना विधान परिषद आ.विक्रांत पाटील, मा.कोकण म्हाडा सभापती बाळासाहेब पाटील पनवेल महानगरप्रमुख- मा.नगरसेवक अॅड प्रथमेशजी सोमण, पनवेल शहर प्रमुख प्रसाद सोनावणे,उपमहानगर संघटक राहुल गोगटे, पनवेल शहर संघटक अभिजित साखरे, पनवेल शहर प्रसिद्धी प्रमुख तोफिक बागवान, उपविभाग प्रमुख गुलाब बागवान, उपविभाग प्रमुख खानदेश धनावडे,शाखा प्रमुख किरण पवार, सिद्धेश पवार, रसूल बागवान यांच्यासह शिवशक्ती मित्र मंडळाचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी महिला आघाडीने त्यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा केला.
फोटो ः