वडाळे तलाव लगतचा हॅप्पी स्ट्रीट नागरिकांसाठी वाहनमुक्त...
वडाळे तलाव लगतचा हॅप्पी स्ट्रीट नागरिकांसाठी वाहनमुक्त...
भाजपाचे उमेश इनामदार यांचा पुढाकार...

पनवेल वैभव / प्रतिनिधी : - दीपावली निमित्ताने रोषणाई व तरुणाईने व्याप्त असा पनवेल येथील वडाळे तलावा लगतचा रस्ता काही दिवसांपासून वाहनांना येण्या -जाण्यासाठी बंद असल्याने नागरिकांना त्रास सहन करावा लागत होता, तसेच लांबून वळसा घालून जावे लागत होते.त्यामुळे तलावाकडे आनंदोत्सव साजरा करण्यास येणाऱ्या नागरिकांना त्रासाला सामोरे जावे लागत होते.

नागरिकांचा ही अडचण लक्षात घेऊन भाजपचे उमेश इनामदार यांनी पुढाकार घेऊन वाहतूक शाखेचे निरीक्षक औदुंबर पाटील यांना नागरिकांची समस्या दाखवून happy स्ट्रीट वर दीपावलीचा आनंद नागरिकांना लुटण्यासाठी त्वरित हा मार्ग पूर्णपणे मोकळा करून देण्याची मागणी केली.

उमेश इनामदार यांनी नागरिकांसाठी केलेल्या मागणीचा तातडीने विचार करून अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची टीम त्या स्थळी पाठवून वाहतुक निरीक्षक औदुंबर पाटील यांनी हैप्पी स्ट्रीट नागरिकांना वाहनमुक्त खुला करून दिला. यामुळे नागरिकांनी आनंद व्यक्त केला आहे.
Comments