पनवेलचे उपविभागीय अधिकारी राहुल मुंडके यांच्या अध्यक्षतेखाली मौजे डुंगी या विमानतळ नदीपात्राने बाधित गावाचे पूर्नवसनाबाबत बैठक संपन्न ; आगामी बैठक महसूल मंत्र्यांच्या दालनात -आ. महेश बालदी
आगामी बैठक महसूल मंत्र्यांच्या दालनात -आ. महेश बालदी  

पनवेल दि.२८ (संजय कदम):  पनवेल तालुक्यातील मौजे डुंगी या विमानतळ नदी पत्राने बाधित गावाच्या पूर्नवसनाबाबत पनवेलचे उपविभागीय अधिकारी राहुल मुंडके यांच्या अध्यक्षतेखाली उपविभागीय अधिकारी कार्यालय, पनवेल येथे बुधवारी बैठक संपन्न झाली. या बैठकीला उरणचे आमदार महेश बालदी प्रामुख्याने उपस्थित होते.
   या बैठकीमध्ये मौजे डुंगी या विमानतळ नदीपात्राने बाधित गावाचे पूर्नवसनाबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. यावेळी आ. महेश बालदी यांनी स्वतः जातीने लक्ष घालून डुंगी गावाच्या पात्रते संदर्भातील पुढील बैठक महाराष्ट्र शासनाच्या महसूल मंत्रांच्या दालनात घेण्यात येईल असे सांगितले. या बैठकीत डुंगी गावातील गावठाणात एकूण १२८ घरे असून यातील गावठाणामधील ५७ घरे पात्रतेनुसार, ७१ गावठाणाच्या बाहेर आहेत. यातील ४६ घरे पात्र आहेत तर ८२ घरे अपात्र आहेत या याबाबत चर्चा झाली. 
यावेळी आमदार महेश बादली, सामाजिक कार्यकर्ते बाळासाहेब नाईक तसेच नायब तहसीलदार शेलार, ग्रुप ग्रामपंचायत पारगाव सरपंच अहिल्या नाईक, उपसरपंच निशा पाटील, सदस्य शिल्पा नाईक, सदस्य विश्वनाथ पाटील, गावातील पंच कमिटी विकास पाटील, श्रीधर पाटील, नितेश पाटील,  दशरथ घरत, मधु नाईक, आदेश नाईक, तसेच सिडकोचे अधिकारी गुजराती, वसुले, तसेच मंडळ अधिकारी तलाठी क्षमा पवार, आदी मान्यवर उपस्थित होते 
फोटो: उपविभागीय अधिकारी कार्यालयात झालेली बैठक.
Comments