किमान वेतनासाठी सिडको, मेट्रोला उपायुक्तांची नोटीस...
किमान वेतनासाठी सिडको, मेट्रोला उपायुक्तांची नोटीस

पनवेल दि. ०५ ( वार्ताहर ) : नवी मुंबई मेट्रो स्थानकात काम कामगारांना सफाई करणाऱ्या ठेकेदाराकडून कमी पगार दिला जात होता. त्यामुळे या कामगारांना किमान वेतन देण्यात यावे, अशी मागणी आझाद कामगार संघटनेचे अध्यक्ष महादेव वाघमारे यांनी सिडको आणि मेट्रोकडे केली होती. त्यानुसार या कामगारांना किमान वेतन देण्यात यावे, अशी नोटीस कामगार उपायुक्त कार्यालयाने बजावली आहे.
                नवी मुंबई मेट्रोच्या तळोजा येथील मेट्रोचे कारशेड, मेट्रो रेल्वे, बस स्थानक, कारशेड आदींच्या साफसफाईचे काम महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन कंपनीने साफसफाईचे काम शुभा सिस्टम व इक्विटर प्रॉपर्टी मँनेजर लिमिटेड कंपनीला दिले आहे. सिडकोने नेमलेल्या शक्ती कन्ट्रक्शन कंपनीकडून सफाई कामगारांना नियमानुसार पगार दिला जात होता; परंतु सिडकोकडून मेट्रोचे हस्तांतरण महाराष्ट्र मेट्रोरेल कॉर्पोरेशनकडे झाल्यानंतर शुभा सिस्टम ठेकेदाराला काम देण्यात आले. शुभा सिस्टम या ठेकेदाराने इक्विटर प्रॉपर्टी मँनेजर या कंपनीला सबकॉन्ट्रैक्ट नेमण्यात आले. या ठेकेदाराकडून ९३ कामगार नेमण्यात आले असून या कामगारांना किमान वेतन दराच्या नियमानुसार कामगारांच्या हातात १७ हजार ३५३ रुपये पगार देणे आवश्यक आहे. मात्र, डिसेंबरपासून या कामगारांना ५ हजार रुपये कमी दिले जात असल्याची तक्रार करण्यात आली होती.
Comments