दोन महिलांच्या मंगळसूत्राची चोरी
पनवेल दि. ०५ ( वार्ताहर ) :खारघर वसाहतीमधील दोन महिल्यांच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र खेचून अज्ञात इसम पसार झाल्याची घटना घडली आहे .
खारघरमधील केंद्रीय विहार बस थांब्यालगत रस्त्यावर एका वयोवृद्ध महिलेचे मंगळसूत्र खेचण्यात आले होते. अशातच अचला हिरामण या महिलेचे मंगळसूत्र देखील खेचल्याची तक्रार खारघर पोलिस ठाण्यात नोंदविण्यात आली आहे. या दोन्ही घटनांमुळे सध्या महिलांमध्ये दहशतीचे वातावरण असून सणासुदीत चोरांचा उपद्रव वाढल्याने कारवाईची मागणी खारघर मधील नागरिक करीत आहेत.