इंनर व्हील क्लब ऑफ पनवेल यांच्यावतीने प्लास्टिक मुक्त विसर्जन..
इंनर व्हील क्लब ऑफ पनवेल यांच्यावतीने  प्लास्टिक मुक्त विसर्जन

पनवेल वैभव दि. ११ ( संजय कदम ) : इंनर व्हील क्लब ऑफ पनवेल यांच्या  वतीने आदई तलाव येथे गणपती विसर्जन करण्यासाठी येणाऱ्या भक्तांकडून प्लास्टिक व कचरा जमा केला व त्याचे निर्मूलन केले.
                     गणपती विसर्जनाच्या वेळी बऱ्याच वेळा प्लास्टिक युक्त कचरा हा तलावाच्या परिसरात राहून जातो त्यामुळे प्रदूषण होते. इंनर व्हील क्लब ऑफ पनवेलच्या  अध्यक्षा संजीवनी मालवणकर ह्यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम राबवण्यात आला सोबत क्लब क्या मा. अध्यक्ष मिनल टिपणीस, क्लब एडिटर डॉ. वीणा मनोहर, सदस्य वंदना बडगुजर, रूबी बोरकर, अंजली कुलकर्णी, ऍड . अपर्णा नाडगौंडी  ह्या उपस्थित होत्या. पनवेल प्लास्टिक वॉरियर्स च्या प्राजक्ता शाह व त्यांचे सदस्य मदतीला उपस्थित होते . तसेच स्थानिक मंडळाचे कार्यकर्ते शिवाजी भागत, भगवान बडगुजर , आशा शेट्टी, सुनील वी सुरेश,सुनील सिन्हा ह्यांचा क्लब च्यl वतीने सत्कार करण्यात आला.त्याच प्रमाणे संबंधित परिसरातील कचरा जमा केला व कोणीही प्लास्टिक युक्त कचरा टाकू नये असे आवाहन करण्यात आले.
फोटो - इंनर व्हील क्लब ऑफ पनवेल यांच्या  वतीने  प्लास्टिक मुक्त विसर्जन
Comments
Popular posts
देशाचे पुढचे राजकारण आपल्या मनासारखे होण्यासाठी इंडियाने एकरूप होऊन काम करावे लागेल - शिवसेना नेते मा.खासदार अनंत गीते..
Image
नैना हटाव शेतकरी बचाव अंतर्गत सिडकोविरोधातील शेतकऱ्यांच्या आमरण उपोषणाला शिवसेनेचा(उद्धव बाळासाहेब ठाकरे) सक्रिय पाठिंबा..
Image
बाबासाहेब लिगल पँथर संघटनेच्या नेतृत्वात पनवेलमध्‍ये प्रथमच भव्य संविधान सम्मान शोभायात्रा(मिरवणुक)संपन्न...
Image
१५ वर्षीय मुलाला कायदेशीर रखवालीतून नेेले पळवून...
Image
तुरमाळे येथील नैना विरोधातील आमरण उपोषणास भेट देत शिवसेना नेते मा.खासदार अनंत गीते यांनी दिला पाठींबा...
Image