याकुब बेग हायस्कूल,व जुनियर कॉलेज येथे शिक्षण तज्ञ मुबारक कापडी यांचे व्याख्यान..
शिक्षण तज्ञ मुबारक कापडी यांचे व्याख्यान
पनवेल दि. २९ ( वार्ताहर ) : पनवेल एजुकेशन सोसायटी संचालित,याकुब बेग हायस्कूल व जुनियर कॉलेज पनवेल व पी.ई.एस.इंग्लिश स्कूल व जुनियर कॉलेज पनवेल येथे प्रसिद्ध शिक्षण तज्ञ मुबारक कापडी यांचे व्यवसाय मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. सदर कार्यक्रमाच्या, अध्यक्षस्थानी पनवेल एजुकेशन सोसायटीचे अध्यक्ष व पनवेलमधील प्रसिद्ध उद्योजक इकबाल हुसैन काझी होते.            
           कार्यक्रमाची सरुवात इशस्त्वनाने झाली यानंतर शाळेतील विद्यार्थ्यांनी स्वागतगीत सादर केले.संस्थेचे अध्यक्ष इक्बाल काझी यांनी संस्थेतर्फे प्रमुख पाहुणे प्रसिद्ध शिक्षण तज्ञ मुबारक कापडी यांचे स्वागत व सत्कार केला .उपस्थित मान्यवरांचे स्वागत याकुब बेग हायस्कूल व जुनियर कॉलेजचे प्राचार्य आसीम पटेल यांनी केले. संस्थेचे सचिव अलीम पटेल यांनी मुबारक कापडी यांच्याबद्दल माहिती दिली.आपल्या अध्यक्षीय भाषणात संस्थेचे व कार्यक्रमाचे अध्यक्ष इक्बाल काझी यांनी हे कार्यक्रम विद्यार्थ्यासाठी उपयुक्त असल्याचे सांगितले तसेच याप्रकारचे कार्यक्रम यापुढेही आयोजित केले जाणार असल्याचे सांगितले. मुबारक कापडी यांनी विद्यार्थ्यांना अभ्यासाचे महत्व ,वेळेचे नियोजन,भविष्यातील संधी,कोण कोणत्या क्षेत्रात करिअर केले जाऊ शकते याबाबत मार्गदर्शन केले.यामध्ये विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त प्रतीसाद दिला.कार्यक्रमाच्या शेवटी प्रश्नो्तराचा तास रंगला विद्यार्थ्याच्या सर्व प्रश्नाची उत्तरे शिक्षणतज्ञ मुबारक कापडी यांनी दिली. सदर कार्यक्रमासाठी व्यासपीठावर संस्थेचे व कार्यक्रमाचे अध्यक्ष इक्बाल काझी, उपाध्यक्ष असिफ शकूर, सचिव अलीम पटेल, खजिनदार माझ मुल्ला, संस्थेचे सदस्य मोहम्मद हनीफ मास्तर,उसामा गुलाम हुसैन पटेल,अब्दुल कुद्दूस डोलारे,पालक, शिक्षक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.आभारप्रदर्शन खजिनदार माझ मुल्ला यांनी केले तर सूत्रसंचालन याकुब बेग प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका अख्तरी दळवी यांनी केले.


फोटो - याकुब बेग हायस्कूल,व जुनियर कॉलेज येथे शिक्षण तज्ञ मुबारक कापडी यांचे व्याख्यान
Comments