खान्देश्वर पोलीस स्टेशनच्या गणरायाचे विसर्जन मोठया उत्साहात संपन्न..
खान्देश्वर पोलीस स्टेशनच्या गणरायाचे विसर्जन मोठया उत्साहात संपन्न..
पनवेल/ प्रतिनिधी
लोकमान्य टिळकाने सर्व लोक एकत्र यावे या करिता गणेश उत्सव सुरु केला हाच आदर्श घेऊन खान्देश्वर पोलीस स्टेशन चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुभाष कोकाटे यांच्या मार्गदर्शना खाली गणेशाची खांदेश्वर पोलीस स्टेशनमध्ये  स्थापना करण्यात आली होती.

सतत जनतेच्या सुरक्षितेसाठी पोलीस बांधव दिवस रात्र कर्तव्य निभावत असतात, गणेशाची स्थापना केल्यामुळे सर्व पोलीस बांधवांमध्ये आनंदाचे वातावरण पाहायला मिळाले. 
खांदेश्वर पोलीस स्टेशन मधील गणरायाची विसर्जन मिरवणूक मोठया उत्साहात काढण्यात आली. विसर्जनाच्या मिरवणूकित गुन्हेगारांसंबंधी जनतेमध्ये जनजागृती करण्यात आली. गर्दीच्या ठिकाणी सुरक्षिता कशी बाळगावी, गुन्हेगारांपासून सावध कसे राहावे, चोरीचा घटना कशा टाळाव्यात आशा अनेक  माध्यमातून जनतेमध्ये जनजागृती करण्यात आली. सर्व वरिष्ठ अधिकारी पोलीस बांधवानी मोठ्या उत्साहात गणपती बाप्पांना निरोप दिला, सर्व गणेश भक्तांनी मिरवणूक काढताना आनंदीमय वातावरणात सुरक्षितता कशी करता येईल ही नेहमी काळजी घ्यावी असे मत वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक कोकाटे यांनी व्यक्त केले मिरवणूक दरम्यान क्राईम ब्रँच वरिष्ठ पोलीस निरीक्षक वैशाली गलांडे, पनवेल महानगरपालिकेच्या मा.उपमहापौर सीताताई पाटील तसेच पोलीस बांधव,पत्रकार बंधू शांतता कमिटी मधील पदाधिकारी उपस्थिती होते.
Comments