१५ वर्षानंतर सिडको करणार आसूडगाव से-04 येथील रस्त्याचे डांबरीकरण ; सिडकोचे लेखी आश्वासन..
महादेव वाघमारे शेकाप कार्याध्यक्ष पनवेल यांनी पुकारलेल्या आमरण उपोषणाला यश
आसूडगाव करांच्या न्याय हक्क व अधिकारासाठी शेकाप मैदानात

पनवेल / वार्ताहर : - आसूडगाव से-04 येथील हनुमानमंदिर ते समाज मंदिर हॉल या रस्त्याचे डांबरीकरण गेल्या 15 वर्षांपासून रखडले होते आसूडगाव मधील बाकी रस्त्याचे काम अनेक वेळा करण्यात आले आहे मात्र ह्याच रस्त्याच्या कामाला 15 वर्ष का लागली असा प्रश्न आसूडगाव येथील रहिवाश्यांना पडला आहे
        रहिवाश्यांनी शेकाप कार्याध्यक्ष महादेव वाघमारे यांना पत्राद्वारे प्रशासनाकडे पाठपुरावा करून रस्त्याचे काम पूर्ण द्यावे असे साकडे घातले 
        वाघमारे यांनी या रहिवासी यांच्या मागणीची दखल घेऊन सिडको कार्यालय नवीन पनवेल येथे 6 सप्टेंबर रोजी आमरण उपोषण पुकारले होते सिडकोने उपोषणाची दखल घेऊन आम्ही या रस्त्याचे काम करणार आहोत तसेच पावसाळा झाला की लगेच रस्त्याचे डांबरीकरण करू असे लेखी आश्वासन सिडकोने वाघमारे यांना दिले  
       सिडकोने लेखी दिलेल्या आश्वासनाला वाघमारे यांनी तात्पुरते आमरण उपोषण स्थगित केले आहे असे सिडकोला व खांदेश्वर पोलीस ठाण्याला पत्र दिले आहे पण पावसाळा एक महिन्यात संपत आहे एक महिन्यात रस्त्याचे काम झाले नाही तर पुन्हा सिडको कार्यालया समोर उपोषण करणार असल्याचे  वाघमारे यांनी पत्रात म्हटले आहे.
Comments
Popular posts
देशाचे पुढचे राजकारण आपल्या मनासारखे होण्यासाठी इंडियाने एकरूप होऊन काम करावे लागेल - शिवसेना नेते मा.खासदार अनंत गीते..
Image
बांगलादेश मधील खुनाच्या गुन्ह्यातील आरोपींना पनवेल शहर पोलिसांकडून अटक...
Image
को.ए.सो. इंदुबाई अ.वाजेकर आणि के.वी.कन्या विद्यालय शाळा समितीच्या चेअरमनपदी प्रितम म्हात्रे यांची निवड..
Image
नैना हटाव शेतकरी बचाव अंतर्गत सिडकोविरोधातील शेतकऱ्यांच्या आमरण उपोषणाला शिवसेनेचा(उद्धव बाळासाहेब ठाकरे) सक्रिय पाठिंबा..
Image
बाबासाहेब लिगल पँथर संघटनेच्या नेतृत्वात पनवेलमध्‍ये प्रथमच भव्य संविधान सम्मान शोभायात्रा(मिरवणुक)संपन्न...
Image