सकल मराठा समाजाकडून स्व.विनायक मेटे यांना श्रद्धांजली अर्पण..
सकल मराठा समाजाकडून स्व.विनायक मेटे यांना श्रद्धांजली अर्पण..

पनवेल / वार्ताहर : - सकल मराठा समाज खांदा कॉलनी च्या वतीने स्व. विनायक मेटे यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी शोक सभेचे आयोजन दिनांक २१/०८/२०२२ रोजी सायंकाळी ७:०० वा जनसेवा आश्रम हॉल, खांदा कॉलनी या ठिकाणी केले होते.

स्व. मेटे यांना जड अंतःकरणाने मराठा समाज बांधवाकडून  श्रद्धांजली वाहण्यात आली. सदरच्या शोक सभेत स्व. मेटे यांच्या मराठा समाजासाठी केलेल्या कार्याचा उजाळा देत  किशोर पाटील - अधीक्षक अभियंता नाशिक, पवार निवृत्त DCP मुंबई , पनवेल महानगर पालिकेच्या माजी नगरसेविका, खारघर फोरम च्या अध्यक्ष लीना अर्जुन गरड , मराठा क्रांती मोर्चा रायगड जिल्हा समन्वयक, माजी नगरसेवक गणेश कडू, मराठा उद्योजक  रामदास शेवाळे, सकल मराठा समाज कळंबोली चे समन्वयक संदीप जाधव, पनवेल महानगरपालिका विद्युत अभियंता बी आर कदम , सुनील औटी, बीड जिल्हा रहिवाशी गोपीनाथ मुंढे, लालासाहेब लोंबटे, उमेश वारदे, बाळासाहेब खोसे , संतोष जाधव आदी मान्यवरांनी शोक व्यक्त केला व अमर रहे !! अमर रहे !! मेटे साहेब अमर रहे च्या घोषणाबाजी करत सभागृह दणाणून सोडले.

या प्रसंगी सकल मराठा समाज मंडळ खांदा कॉलनी , शिवसंग्राम संघटना, बीड जिल्हा रहिवाशी खांदा कॉलनी येथील समाज बांधव उपस्थित होते.
Comments
Popular posts
'शौर्यम दिवस' के मौके पर 'शौर्यम ट्रिब्यूट बाइक राइड' का आयोजन...
Image
नवीन पनवेल मध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) तर्फे एसटी स्मार्ट कार्ड वाटप...
Image
हृदयाच्या आरोग्यासाठी खारघरमध्ये 'वॉकेथॉन' ; जागतिक हृदय दिनानिमित्त मेडिकव्हर हॉस्पिटल्सचा उपक्रम...
Image
स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाच्या युथ रिपब्लिकनचे रायगड जिल्हाध्यक्ष महेश साळुंखेंची पेणमध्ये सदिच्छा भेट ; बौद्ध महासभेच्या कार्यक्रमाला उपस्थिती
Image
उड्डाणपुलाखालील मोकळ्या जागेत क्रीडांगण उभारण्याची मागणी ; नगरसेवक ऍड.मनोज भुजबळ यांचे महापौरांना निवेदन
Image