महानगरपालिका क्षेत्रात पार्किंग हब निर्माण करा; तालुकाप्रमुख विश्वास जगन्नाथ पेटकर यांची मागणी...
तालुकाप्रमुख विश्वास पेटकर यांची मागणी

पनवेल दि २५ (संजय कदम) : पनवेल महानगरपालिका क्षेत्रात पार्किंग हब निर्माण करा अशी मागणी शिवसेना तालुकाप्रमुख विश्वास जगन्नाथ पेटकर यांनी पनवेल महानगरपालिकेचे आयुक्त गणेश देशमुख यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. 
पनवेलमध्ये गौरी गणपती, दीपावली सणाच्या दिवशी होणारी वाहतूक कोंडी, त्यामुळे होणारे सर्वसामान्य नागरिकांना त्रास,यापासून सुटका व्हावी व पार्किंग व्यवस्था करावी म्हणून शिवसेना संपर्कप्रमुख बबनदादा पाटील यांच्या व जिल्हाप्रमुख शिरीष घरत यांच्या मार्गदर्शनाने पनवेल महानगरपालिका आयुक्त गणेश देशमुख यांना पनवेल तालुका शिवसेना तालुका प्रमुख विश्वास पेटकर यांनी निवेदन दिले. यावेळी त्याच्या सोबत उपतालुका प्रमुख शांताराम कुंभारकर,विभागप्रमुख प्रमोद पाटील व गडगे उपस्थित होते


फोटो : आयुक्त गणेश देशमुख यांना निवेदन देताना तालुकाप्रमुख विश्वास जगन्नाथ पेटकर यांच्यासह इतर मान्यवर
Comments