विविध समाजोपयोगी कार्यक्रम संपन्न...
पनवेल वैभव / प्रतिनिधी : - "७५ वा आजादी का अमृतमहोत्सव " निमित्ताने केदार भगत मित्र परिवार यांच्याकडून विरुपाक्ष मंदिर पनवेल येथे आलेल्या सर्व भाविकांना उपवासाची खिचडी वाटप करण्यात आले.
हजारो भाविकांनी खिचडीचा आस्वाद घेतला तसेच मोफत आधारकार्ड ला मोबाईल लिंक करून दिले जात होते याचाही शेकडो नागरिकांनी लाभ घेतला व पोस्टाची सुकन्या समृद्धी खाते हे हि मोफत काढून दिले गेले याचाही नागरिकांनी लाभ घेतला व केदार भगत यांचे यावेळी नागरिकांनी आभार मानले .
यावेळी पनवेलचे कार्यसम्राट आमदार प्रशांत ठाकूर माजी सभागृह नेते परेश ठाकूर, भाजप महाराष्ट्र प्रदेश सदस्य श्रीनंद पटवर्धन, माजी नगरसेवक अनिल भगत, माजी नगरसेवक राजू सोनी ,माजी नगरसेवक अजय बहिरा ,माजी नगरसेविका रुचिता लोंढे, भूपेंद्र पाटील ,शिंदे गटाचे गणेश वाघीलकर, अभि दुर्गे, फाल्गुनी दुर्गे,चंद्रकांत मंजुळे ,नीता मंजुळे, भरत जाधव ,बाळा जाधव, प्रसाद म्हात्रे ,अमरीश मोकल ,रुपाली शिंदे ,संजू पाटील ,गौरव बांठिया या मान्यवरांनी कार्यक्रमास भेट देऊन शुभेच्छा दिल्या.
केदार भगत मित्र परिवाराच्या सर्व महिला व कार्यकर्त्याचे केदार भगत यांनी यावेळी आभार मानले.