घरोघरी तिरंगा या देशव्यापी अभियानात महिला दक्षता समितीने सुद्धा सहभाग घेण्याचे पनवेल शहर पोलीस ठाण्यामार्फत आवाहन..
पनवेल शहर पोलीस ठाण्यामार्फत आवाहन

पनवेल वैभव, दि.९ (संजय कदम) ः तिरंगा म्हणजे भारतीय स्वातंत्र्य लढ्याचे प्रतिक आहे. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवात राष्ट्रध्वजाचा मान व सन्मान राखून घरोघरी तिरंगा (हर घर तिरंगा) या देशव्यापी अभियानात पनवेल शहर पोलीस ठाण्याच्या अंतर्गत असलेल्या महिला दक्षता समितीने सुद्धा सहभाग घ्यावा, असे आवाहन पनवेल शहर पोलीस ठाण्याच्या वतीने आज झालेल्या बैठकीत करण्यात आले.
वपोनि विजय कादबाने यांच्या मार्गदर्शनाखाली महिला सहाय्यक पोलीस निरीक्षक मोनिका चौधरी, एस.आय. संजय धारेराव यांनी आज पनवेल शहर पोलीस ठाण्याच्या अंतर्गत महिला दक्षता समितीची बैठक घेतली होती. या बैठकीला मोठ्या संख्येने महिला सदस्य उपस्थित होत्या. यावेळी त्यांना घरोघरी तिरंगा या अभियानासंदर्भात माहिती देण्यात आली. तसेच जास्तीत जास्त लोकांनी यात सहभागी होण्यासाठी आवाहन सुद्धा करण्यात आले आहे. तसेच आवश्यक त्या सुचना त्यांना यावेळी देण्यात आल्या. 



फोटो ः पनवेल शहर पोलीस ठाण्यांतर्गत महिला समितीची बैठक
Comments